दरवाढीनंतर Airtel चा सर्वात स्वस्त प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन! जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स
टॅरिफ हाईकनंतर Airtel चा स्वस्त प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन
Airtel चा एंट्री-लेव्हल ट्रुली अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन आता 199 रुपयांना उपलब्ध आहे.
Airtel च्या बेसिक पोस्टपेड प्लॅनची किमत 449 रुपये इतकी आहे. पाहुयात बेनिफिट्स
भारतीय दूरसंचार कंपनी भारती Airtel आणि इतर खाजगी ऑपरेटर्सने रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. या बदलानंतर आता ग्राहकांना दूरसंचार सेवांचा आनंद घेण्यासाठी केवळ प्रीपेडच नाही तर पोस्टपेड अशा दोन्ही विभागांमध्ये अगदी एंट्री-लेव्हल रिचार्जसाठीही जास्त खर्च करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊयात Airtel च्या स्वस्त प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनची किंमत आणि सर्व डिटेल्स-
Airtel चा स्वस्त प्रीपेड प्लॅन
जर तुम्ही Airtel चे प्रीपेड प्लॅन खरेदी करू इच्छित असाल तर, लक्षात घ्या की, Airtel चा एंट्री-लेव्हल ट्रुली अनलिमिटेड प्लॅन आता 199 रुपयांना उपलब्ध आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS ऑफर केले जातात. तर वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल.
त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर डेटा वापरासाठी प्रति MB 50 पैसे आकारले जातील. एवढेच नाही तर, Airtel या प्लॅनसह रिवॉर्ड बेनिफिट्स देखील ऑफर करतो. ज्यामध्ये विंक म्युझिक आणि फ्री हॅलोट्यून्सचा समावेश आहे. याद्वारे युजर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दर महिन्याला एक ट्यून सेट करू शकतो.
Airtel चा स्वस्त पोस्टपेड प्लॅन
Airtel च्या बेसिक पोस्टपेड प्लॅनची किमत 449 रुपये इतकी आहे. या किमतीत हा प्लॅन मासिक भाड्याने उपलब्ध आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, डेली 100SMS मिळतील. तर डेटा वापरासाठी तुम्हाला 50GB मासिक डेटा सोबत 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर मिळतो.
याव्यतिरिक्त, ग्राहक या रिचार्जसह 5G कव्हरेज क्षेत्रात एका 5G हँडसेटवर मोफत अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील घेऊ शकतात. Airtel रिवॉर्ड बेनिफिट्समध्ये 3 महिन्यांसाठी Airtel एक्स्ट्रीम प्ले प्रीमियम समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, ग्राहक अतिरिक्त 349 रुपयांमध्ये त्यांच्या प्लॅनमध्ये इतर कौटुंबिक कनेक्शन देखील जोडू शकतात. या दोन्ही प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी आणि प्लॅन खरेदी करण्यासाठी Airtel च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile