Jio आणि VI प्रमाणे, देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Airtel कडे रिचार्ज प्लॅनची मोठी यादी आहे. 21 दिवसांपासून ते 365 दिवसांपर्यंतचे रिचार्ज कंपनीकडे उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एका दिवसाचा खर्च 5 रुपयांपेक्षा कमी आहे आणि यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनची किंमत 1,799 रुपये इतकी आहे.
हे सुद्धा वाचा: International Yoga Day : फिटनेसची काळजी घेणे झाले आणखी सोपे, iPhone साठी सर्वोत्कृष्ट पाच योग ऍप्स
Airtelचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, जो वर्षभराच्या वैधतेसह येतो. जर तुम्ही 1,799 रुपये बघितले तर 1 दिवसाचा खर्च 4.9 रुपये येतो. प्लॅनमध्ये एकूण 24 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 3600 SMS देण्यात आले आहेत. याशिवाय, तुम्हाला एअरटेल थँक्स बेनिफिट्स (विंक म्युझिक, फ्री HelloTunes, Apollo 24X7 सर्कलसह) मोफत मिळतात.
कंपनीकडे 2,999 रुपये आणि 3,359 रुपयांचे आणखी दोन प्लॅन आहेत, जे 365 दिवसांची वैधता देतात. 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. याशिवाय यामध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्सचा ऍक्सेस देखील उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे, 3,359 रुपयांच्या प्लॅनमध्ये अधिक डेटासह OTT फायदे देखील मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जातात. विशेष गोष्ट म्हणजे यात Disney + Hotstar चे 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. याशिवाय एअरटेल थँक्स बेनिफिट्सचा ऍक्सेस देखील मिळेल.