एयरटेल ने आपल्या 149 आणि 399 रुपयांच्या प्लान मध्ये केले बदल, आता मिळेल कमी डेटा

Updated on 17-Jul-2018
HIGHLIGHTS

एयरटेल प्रीपेड यूजर्सना आता 149 रुपयांच्या प्लान मध्ये प्रतिदिन 1GB आणि 399 रुपयांच्या प्लान मध्ये 1.4GB डेटा मिळेल.

Airtel changed Rs 149 and Rs 399 plans, will get less data: भारती एयरटेल ने आपल्या 149 आणि 399 रुपयांच्या प्रीपेड प्लान्स मध्ये काही बदल केले आहेत. एयरटेल ने या प्लान्स मध्ये मिळणारे डेटा बेनेफिट्स कमी केले आहेत. मागील महिन्यात कंपनी ने 149 रुपयांच्या प्लान मध्ये प्रतिदिन 2GB डेटा ऑफर केला होता जो निवडक यूजर्स साठी उपलब्ध होता, तसेच 399 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये प्रतिदिन 2.4GB डेटा मिळत होता. एयरटेल च्या या ऑफर नंतर लगेचच जियो ने आपली डबल धमाका ऑफर सादर केली होती ज्यात प्रीपेड यूजर्सना 149 रुपयां वरील सर्व रिचार्ज वर प्रतिदिन 1.5GB अतिरिक्त डेटा मिळाला होता. जियो ची ही ऑफर 30 जून 2018 ला संपली. 

आता एयरटेल च्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये प्रतिदिन 1GB डाटा, अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळतील तसेच या प्लान ची वैधता 28 दिवस आहे त्याचबरोबर वॉयस कॉल्स वर कोणतीही FUP लिमिट नाही. दुसरीकडे 399 रुपयांच्या प्लान मध्ये प्रतिदिन 1.4GB डाटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळतील, ज्याची वैधता 84 दिवस आहे. 399 रुपयांच्या हा प्लान काही यूजर्स साठी 84 दिवस तर काहींसाठी 70 दिवसांसाठी वैध आहे. यूजर्स प्लान ची वैधता जाणून घेण्यासाठी माय एयरटेल अॅप किंवा एयरटेल वेबसाइट वर जाऊ शकतात. 

फक्त प्रीपेड सेगमेंट मध्ये नाही तर, एयरटेल आपल्या पोस्टपेड प्लान्स मध्ये पण सतत बदल करून या स्पर्धेत टिकून आहे. एयरटेल ने या वर्षीच्या सुरवातीला 499, 649, 799 आणि 1,199 रुपयांच्या पोस्टपेड प्लान्स मध्ये बदल केले होते. एयरटेल च्या 649 रुपयांच्या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90GB डेटा मिळतो, त्याचबरोबर यूजर्सना एक अॅड-ऑन कनेक्शन, रोमिंग मध्ये पण अनलिमिटेड वॉयस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS, एयरटेल सिक्योर चे फ्री सब्सक्रिप्शन, एयरटेल TV, विंक म्यूजिक आणि एका वर्षासाठी अमेजॉन प्राइम मेम्बरशिप सारख्या ऑफर्स पण मिळत आहेत. 499 रुपयांच्या माय प्लान इनफिनिटी पोस्टपेड प्लान मध्ये 75GB डेटा मिळतो आणि सोबतच यूजर्सना 500GB पर्यंतची डाटा रोलओवर सुविधा पण मिळते. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :