Airtel चा Best प्लॅन! 12+ OTT ॲप्ससह मिळेल Unlimited कॉलिंग आणि भरपूर डेटा, बघा किंमत 

Airtel चा Best प्लॅन! 12+ OTT ॲप्ससह मिळेल Unlimited कॉलिंग आणि भरपूर डेटा, बघा किंमत 
HIGHLIGHTS

Airtel Black आपल्या ग्राहकांसाठी एकाच बिलात अनेक सर्व्हिस प्रदान करते.

Airtel Black चा 998 रुपयांचा प्लॅन Bharti Airtel चा बेस्ट सेलर प्लॅन

हे प्लॅन्स वापरकर्त्यांना OTT बेनिफिट्स देखील मिळतात.

Bharti Airtel ची बंडल सेवा Airtel Black आपल्या ग्राहकांसाठी एकाच बिलात अनेक सर्व्हिस प्रदान करते. त्यामुळे मोबाईल, फिक्स्ड ब्रॉडबँड आणि DTH साठी एकापेक्षा जास्त बिल भरण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel Black कंपनीच्या ARPU वर नेत आहे. पण ही सर्व्हिस प्रत्येकासाठी नाही, कारण ग्राहकांना या सर्व्हिससाठी मोठी रक्कम भरावी लागते. कनेक्टिव्हिटी सेवांसाठी एवढी मोठी रक्कम देणे प्रत्येकाला परवडत नाही.

मात्र, काही प्लॅन्स परवडणाऱ्या विभागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 1000 रुपयांच्या अंतर्गत असलेल्या प्लॅन्सबद्दल महिती देणार आहोत. हे प्लॅन्स वापरकर्त्यांना OTT बेनिफिट्ससह अनेक सेवा ऑफर करतात.

Airtel Black Rs 998 Plan

Airtel Black चा 998 रुपयांचा प्लॅन

Airtel Black चा 998 रुपयांचा प्लॅन Bharti Airtel ने Airtel Black वेब पेजवर बेस्ट सेलर म्हणून दाखवले आहे. हा प्लॅन फायबर + लँडलाइन + पोस्टपेड (2 कनेक्शन) सह येतो. फायबर कनेक्शनमध्ये, वापरकर्त्यांना 40Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड-लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शनसह अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. पोस्टपेड कनेक्शनमध्ये दोन कनेक्शन, 105GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि SMS फायद्यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला नियमित सिम आणि ॲड-ऑन सिमचा लाभ देखील मिळेल.

Airtel Black Rs 998 Plan

OTT बेनिफिट्स उपलब्ध

वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 12+ OTT ॲप्सचे ऍक्सेस मिळेल. यामध्ये बंडल्ड OTT ॲप्स लोकप्रिय Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Airtel Xstream ऍप्स आहेत. Airtel Xstream ॲपसह, ग्राहकांना SonyLIV, Lionsgate Play, Eros Now, HoiChoi, ShemarooMe, Klikk आणि इतरांसह 12 हून अधिक OTT प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस मिळणार आहेत.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, या प्लॅनचे रिचार्ज करण्यासाठी तुम्ही पेमेंट लिंकद्वारे 3300 रुपये ॲडव्हान्स म्हणून देऊ शकता. यासह Airtel द्वारे हार्डवेअर इन्स्टॉलेशन मोफत केले जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भरलेली अतिरिक्त रक्कम भविष्यातील बिलांमध्ये जोडली जाणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo