Airtel Black Offer: मोबाईल, DTH आणि ब्रॉडबँड 30 दिवस फ्री, Airtelकडून ग्राहकांना खास भेट
Airtel कडून ग्राहकांसाठी विशेष गिफ्ट
AIRTEL पोस्टपेड, DTH आणि ब्रॉडबँड 30 दिवस फ्री
Airtel Black Offer अंतर्गत पहिल्या महिन्याच्या बिलवर सवलत
संपूर्ण महिनाभर एकही पैसा खर्च न करता तुम्हाला मोफत कॉलिंग, DTH आणि ब्रॉडबँड सेवा मिळतेय, असे शक्य आहे का ? तुम्हीही अशा ऑफरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम कंपनी Airtel आपल्या ग्राहकांना ही खास भेट देत आहे. वास्तविक, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी अशा नावीन्यपूर्ण ऑफर आणतचं असते. मोफत ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 'Airtel Black' चा भाग व्हायचे आहे. ही कंपनीची बंडल सेवा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना पोस्टपेड, DTH (डायरेक्ट-टू-होम) आणि ब्रॉडबँड सेवांसह अनेक गोष्टी एकाच प्लॅन अंतर्गत मिळतात.
हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! आजपासून Oppo Reno 8 स्मार्टफोन प्री-ऑर्डर करा, पहा डिटेल्स
सध्या, जर तुम्हाला एअरटेलच्या एकापेक्षा जास्त सेवा मोफत वापरायच्या असतील, तर तुमच्यासाठी Airtel Black हा सर्वोत्तम पर्याय आहे. Airtel Black सह, ग्राहकांना 30 दिवस मोफत पोस्टपेड, DTH आणि ब्रॉडबँड सेवा मिळू शकते. ही ऑफर बऱ्याच काळापासून आहे. खरं तर, कंपनीने 2021 मध्ये एअरटेल ब्लॅक सेवेची घोषणा केली होती, तेव्हापासून ही फ्री ट्रायल ऑफर आहे. 30 दिवसांची फ्री ट्रायल ऑफर प्रत्यक्षात कशी कार्य करते ते जाणून घेऊयात…
AIRTEL पोस्टपेड, DTH आणि ब्रॉडबँड 30 दिवस फ्री
AIRTEL ब्लॅक सेवेचा भाग होण्यासाठी ग्राहकांना पोस्टपेड, DTH आणि ब्रॉडबँडमधून किमान दोन सेवा घ्याव्या लागतील. एअरटेल ब्लॅक ऑफर अंतर्गत, नवीन प्लॅन किंवा सेवा वापरणाऱ्या ग्राहकाला प्लॅनच्या किमतीएवढी सवलत दिली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रु. 1,099 चा प्लान वापरायचा असेल, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या बिलावर रु. 1,099 ची सूट मिळेल.
याव्यतिरिक्त, जर तुम्हाला एअरटेलची पोस्टपेड, DTH आणि ब्रॉडबँड सेवा एकत्र वापरायची असेल, तर तुम्ही या तिन्ही सेवा एका महिन्यासाठी मोफत वापरू शकाल. एअरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये, सर्व सेवांसाठी एकच बिल तयार केले जाते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile