दीर्घकालीन वैधता आणि भरपूर डेटासह Airtel चे Best रिचार्ज प्लॅन्स, अनेक अप्रतिम बेनिफिट्स उपलब्ध। Tech News

दीर्घकालीन वैधता आणि भरपूर डेटासह Airtel चे Best रिचार्ज प्लॅन्स, अनेक अप्रतिम बेनिफिट्स उपलब्ध। Tech News
HIGHLIGHTS

Airtel च्या 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सची यादी

निवडक प्रीपेड प्लॅनसह दररोज 3GB पर्यंत डेटा मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये डेटा कॉलिंगसारख्या बेनिफिट्ससह OTT सब्स्क्रिप्शनचा लाभ देखील मिळेल.

Bharti Airtel कडे अनेक अप्रतिम प्लॅन्स आहेत, जे दररोज डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि बरेच अतिरिक्त फायदे ऑफर करतात. विशेष म्हणजे टेलिकॉम दिग्गज निवडक प्रीपेड प्लॅनसह दररोज 3GB पर्यंत डेटा देखील प्रदान करते, जेणेकरून गरजू वापरकर्त्याला मोबाइल डेटाची कमतरता होणार नाही. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह अधिक डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी Airtel च्या सर्वोत्तम प्लॅन्सची माहिती देणार आहोत. लक्षात घ्या की, Airtel कडे या वैधतेसह एकूण चार अमर्यादित प्रीपेड प्लॅन्स आहेत. यादी पुढीलप्रमाणे-

Airtel चा 455 रुपयांचा प्लॅन

जर तुम्ही डेटापेक्षा जास्त व्हॉइस कॉल बेनिफिटची गरज असेल तर, हा Airtel प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी फक्त 6GB डेटा मिळतो. तसेच, तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता. तसेच, दररोज 100SMS देखील तुम्हाला मिळणार आहेत. या प्लॅनसह Hello Tunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Airtel 779 Prepaid Plan
Airtel Prepaid Plan

Airtel चा 719 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या 719 रुपयांच्या Airtel रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS आणि मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन देखील दिले जातात. हा प्लॅन ​84 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Airtel चा 839 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS उपलब्ध आहेत. विशेष बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. तसेच, Disney+Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन रिचार्जमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाईल.

Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS मिळतात. इतर प्लॅनप्रमाणे, या प्लॅनमध्ये देखील मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन Amazon Prime सबस्क्रिप्शनचा लाभ मिळणार आहे. यासह तुम्ही अनेक लोकप्रिय शोज आणि चित्रपट बघू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo