अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी Jio ने आपल्या युजर्ससाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी Airtel आणि Vodafone Idea (Vi) देखील मागे नाहीत. दोन्ही कंपन्यांनी घोषणा केली आहे की, त्यांनी शहरात नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढवली आहे. हे टेलिकॉम नेटवर्क पायाभूत सुविधांना विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्टँड, प्रमुख ऐतिहासिक क्षेत्रे, हॉटेल्स आणि शहरातील इतर सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना कव्हर करण्यास मदत करेल.
Airtel ने व्हॉईस आणि डेटा सेवा आणखी वाढवण्यासाठी अतिरिक्त नेटवर्क साइट्स सज्ज केल्या आहेत. तसेच, सेल ऑन व्हाईल्स आणि संपूर्ण शहरात ऑप्टिक फायबर केबल्स देखील टाकल्या आहेत. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर कव्हर करण्यासाठी काही अतिरिक्त साइट्स आणि BTS देखील स्थापन करण्यात आल्या आहेत.
हाय-स्पीड डेटाची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांना कव्हर करण्यासाठी शहरात Airtel फायबरची देखील सोय करण्यात आली आहे.
लक्षात घ्या की, Airtel ने अयोध्या धाम, अयोध्या कॅंट, विमानतळ, कटरा रेल्वे स्टेशन, बस स्टँड, रामप्रस्थ पार्क, राम भद्रा, ब्रह्मकुंड, गुप्तर घाट, परिक्रमा मार्ग, महामार्ग येथे CoW (सेल ऑन व्हील्स) सज्ज केले आहेत. संपूर्ण अयोध्येत अखंड सेवा सुनिश्चित करण्यासाठी नेटवर्क अभियंत्यांसह अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त केले आहे, असे देखील टेलिकॉम नेटवर्कने सांगितले आहे.
Vi ने सर्व स्थानिक प्रमुख क्षेत्रातील विद्यमान साइट्स अपग्रेड केल्या. दूरसंचार विभाग आणि इतर विभागांनी टॉवरसाठी जागा, साहित्य आणि मनुष्यबळाची हालचाल यासाठी त्वरित मंजुरी दिली. Vi ने सर्व स्पेक्ट्रम बँडमध्ये नेटवर्कचा विस्तार करून, क्षमता वाढवून आणि बॅकहॉल कनेक्टिव्हिटी वाढवून नेटवर्क कव्हरेज सुधारले आहे. Vi ने अयोध्या रेल्वे स्थानक, राम मंदिर परिसर, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि लखनौ आणि वाराणसी यांना जोडणाऱ्या सेवा दिल्या आहेत. महामार्गांवर नवीन साइट्स जोडल्या आहेत.