Airtel की Jio : 500 रुपयांअंतर्गत कुणाचे प्लॅन्स ठरतात तुमच्यासाठी अप्रतिम ?
Airtel च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 40GB डेटा मिळेल.
तर, 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75GB डेटा देते.
JIO च्या दोन्ही प्लॅनमधील फायदे बघा
Airtel आणि Jio हे भारतातील दोन मोठे दूरसंचार ऑपरेटर आहेत आणि दोघेही उत्तम प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड सेवा देतात. आज आम्ही एअरटेल आणि जिओच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे 500 रुपयांच्या अंतर्गत येतात.
Airtel चा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
प्लॅनमध्ये 40GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, प्रतिदिन 100 SMS आणि Airtel Thanks Rewards सारखे फायदे उपलब्ध आहेत. तर, यात मोफत फॅमिली ऍड-ऑन किंवा OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
Airtel चा 499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
75GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Airtel Thanks Rewards सारखे फायदे या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. Airtel 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप, 1 वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन आणि Wynk Premium इत्यादी बेनिफिट्स देतो.
JIO चा 299 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये 30GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. याशिवाय Jio युजर्स Jio ऍप्स JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळवू शकतात. यात 5Gचा लाभ देखील मिळणार आहे.
JIO चा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
प्लॅनमध्ये 75GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS, 3 मोफत कुटुंब सदस्य त्यात प्रति सिम 5GB अतिरिक्त डेटा असे फायदे मिळतात. Jio वापरकर्ते Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud इत्यादी Jio ऍप्सचा लाभ घेऊ शकतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile