जर तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी नवीन प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला Airtel च्या उत्कृष्ट पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. एअरटेलकडे फॅमिली प्लॅन लिस्टमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला यात 599 रुपये, 999 रुपये आणि 1,199 रुपये अशा तीन प्लॅन्सचा समावेश आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel च्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. बघा सविस्तर-
Airtel च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रायमरी कनेक्शनसाठी दरमहा 100GB डेटा दिला जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. त्याबरोबरच, ग्राहकांना दररोज 100 SMS देखील मिळणार आहेत. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांना कुटुंबातील सदस्यांसाठी 3 मोफत ऍड ऑन रेगुलर व्हॉइस कनेक्शन मिळतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, प्लॅनमध्ये 190GB मासिक डेटा उपलब्ध आहे. ज्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे प्रायमरी कनेक्शनसाठी 100GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच, इतर तिन्ही कनेक्शनसाठी प्रत्येकी 30GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, ग्राहक या प्लॅनमध्ये 9 ऍड ऑन कनेक्शन्स सामील करू शकतात. प्रत्येक कनेक्शनसाठी प्रति महिना 299 रुपये स्वतंत्र शुल्क द्यावे लागेल. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 999 रुपयांच्या किंमतीनंतर, वेगळे शुल्क देखील लागू होऊ शकते.
या प्लॅनमध्ये OTT लाभ देखील उपलब्ध आहेत. हा प्लॅन 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप देतो. त्याबरोबरच, Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनसह हँडसेट प्रोटेक्शन, Airtel Xtreme प्ले आणि विंक प्रीमियममध्ये ऍक्सेस उपलब्ध आहे.