Airtel चा आकर्षक प्लॅन! 190GB डेटासह मिळेल Unlimited कॉलिंग आणि OTT सब्स्क्रिप्शन, वाचा डिटेल्स | Tech News

Airtel चा आकर्षक प्लॅन! 190GB डेटासह मिळेल Unlimited कॉलिंग आणि OTT सब्स्क्रिप्शन, वाचा डिटेल्स | Tech News
HIGHLIGHTS

Airtel च्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये प्रचंड फायदे उपलब्ध

या प्लॅनमध्ये 190GB मासिक डेटासह OTT सब्स्क्रिप्शन मिळेल.

कुटुंबातील सदस्यांसाठी 3 मोफत ऍड ऑन रेगुलर व्हॉइस कनेक्शन देखील मिळतात.

जर तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी नवीन प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला Airtel च्या उत्कृष्ट पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. एअरटेलकडे फॅमिली प्लॅन लिस्टमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला यात 599 रुपये, 999 रुपये आणि 1,199 रुपये अशा तीन प्लॅन्सचा समावेश आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel च्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. बघा सविस्तर-

Airtel चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Airtel च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रायमरी कनेक्शनसाठी दरमहा 100GB डेटा दिला जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. त्याबरोबरच, ग्राहकांना दररोज 100 SMS देखील मिळणार आहेत. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांना कुटुंबातील सदस्यांसाठी 3 मोफत ऍड ऑन रेगुलर व्हॉइस कनेक्शन मिळतात.

airtel

आम्ही तुम्हाला सांगतो की, प्लॅनमध्ये 190GB मासिक डेटा उपलब्ध आहे. ज्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे प्रायमरी कनेक्शनसाठी 100GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच, इतर तिन्ही कनेक्शनसाठी प्रत्येकी 30GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, ग्राहक या प्लॅनमध्ये 9 ऍड ऑन कनेक्शन्स सामील करू शकतात. प्रत्येक कनेक्शनसाठी प्रति महिना 299 रुपये स्वतंत्र शुल्क द्यावे लागेल. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 999 रुपयांच्या किंमतीनंतर, वेगळे शुल्क देखील लागू होऊ शकते.

या प्लॅनमध्ये OTT लाभ देखील उपलब्ध आहेत. हा प्लॅन 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप देतो. त्याबरोबरच, Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनसह हँडसेट प्रोटेक्शन, Airtel Xtreme प्ले आणि विंक प्रीमियममध्ये ऍक्सेस उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo