आता एकाच प्लॅनमध्ये संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणे, अगदी सोपे झाले आहे. टेलिकॉम दिग्गज AIRTEL आपल्या ग्राहकांसाठी फॅमिली पोस्टपेड प्लॅन ऑफर करतो. AIRTELच्या एकाच प्लॅनद्वारे संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार आहेत. कुटुंबातील प्रत्येकाने आता वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. चला तर मग कंपनीच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सची माहिती घेऊयात-
AIRTEL च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सची किमंत 599 रुपयांपासून सुरु होते. तसेच, 999 आणि 1199 रुपयांचे प्लॅनदेखील सामील आहेत. आज आम्ही तुम्हाला चार युजर्स वापरु शकतील, अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत. म्हणजेच 999 रुपयांच्या AIRTEL फॅमिली पोस्टपेड प्लॅनबद्दल सविस्तर माहिती पुढे वाचा.
AIRTEL चा हा प्लॅटिनम प्लॅन एका मुख्य कनेक्शनसह तीन ऍड ऑन कनेक्शन ऑर करतो. यामध्ये 190GB मासिक डेटा देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्य कनेक्शनसाठी 100GB आणि इतर तिन्ही कनेक्शनसाठी 30GB डेटा देण्यात येईल. तसेच या मध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र डेटा मर्यादा संपल्यानंतर शुल्क आकारले जाईल.
या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देण्यात आले आहे. यात लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सची सुविधा मिळते. तसेच, दररोज 100SMSची सुविधा देखील यात उपलब्ध आहे. इतर फायद्यांमध्ये कंपनी सहा महिन्यांसाठी Amazon Prime सदस्यत्व, एक वर्षाचे Disney + Hotstar मोबाईल सब्स्क्रिप्शन, Xtreme Mobile, Wynk प्रीमियम आणि हँडसेट प्रोटेक्शन मिळतो.
या प्लॅनमध्ये अतिरिक्त कनेक्शनदेखील ऍड करता येतील. एकूण 9 प्लॅनमध्ये कनेक्शन सामील करू शकता. प्रत्येक कनेक्शनसह 299 रुपयांचा खर्च येणार आहे.