एयरटेल 99 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये आता देत आहे प्रतिदिन 2GB डाटा

Updated on 18-Jun-2018
HIGHLIGHTS

हा प्लान जियो च्या 98 रुपयांच्या प्लान सारखा आहे ज्यात प्रतिदिन 2GB 4G डाटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि 300 SMS 28 दिवसांसाठी मिळतात.

जियो च्या टेलीकॉम मार्केट मधील एंट्री नंतर सर्व कंपन्या नवीन ऑफर्स आणून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि जियो च्या डबल धमाका ऑफर बद्दल बोलायचे तर जियो ला टक्कर देण्यासाठी पण एयरटेल यूजर्स नवीन प्लान ची वाट बघत आहेत. एयरटेल ने आपल्या 99 रुपयांचा प्रीपेड प्लान रिवाइज केला आहे. हा प्लान कंपनी ने काही निवडक यूजर्स साठी बदलले आहे आणि हा प्लान जियो च्या 98 रुपयांच्या प्रीपेड प्लानला टक्कर देईल. एयरटेल आता या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी प्रतिदिन 2GB, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि 100 SMS मिळत आहेत. या प्लान ने रिचार्ज केल्या नंतर 28 दिवसांसाठी मान्य आहे. हा प्लान जियो च्या 98 रुपयांच्या प्लान सारखा आहे ज्यात प्रतिदिन 2GB 4G डाटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि 300 SMS 28 दिवसांसाठी मिळतात.

SMS बद्दल बोलायचे तर जियो च्या या प्लान मध्ये काही दिवसांसाठी फक्त 300 SMS मिळतात तर एयरटेल प्रतिदिन 100 SMS देत आहे ज्यामुळे एकूण वैधते मध्ये यूजर्सना 2800 SMS चा लाभ मिळत आहे. या महिन्याच्या आधी एयरटेल ने आपल्या 149 रुपयांच्या प्लान मध्ये प्रतिदिन 2GB डाटा आणि 399 रुपयांच्या प्लान मध्ये 2.4GB डाटा देणे सुरू केले होते. जियो च्या 149 रुपयांच्या प्लान मध्ये प्रतिदिन 3GB डाटा मिळतो ज्याची वैधता 28 दिवसांची आहे. 

जियो डबल धमाका ऑफर अंतर्गत यूजर्सना एक निश्चित समय साठी प्रत्येक प्रीपेड प्लान वर प्रतिदिन अतिरिक्त 1.5GB डाटा मिळेल. निवडक सब्सक्राइबर्स साठी कोणतीही ऑफर घेऊन येण्या ऐवजी कंपनी ने सर्व प्रीपेड ग्राहकांना ही ऑफर दिली आहे. या नवीन ऑफर सह जियो 4G डाटा चा प्रति GB दर Rs 1.77 वर घेऊन आली आहे, जो आता पर्यंतचा सर्वात कमी दर आहे. रिलायंस जियो च्या 149 रुपयांच्या एंट्री-लेवल प्लान मध्ये 28 दिवसांसाठी 3GB डाटा मिळत आहे, ज्यामुळे 1GB ची किंमत फक्त Rs 1.77 होते. पण, जियो ची ही ऑफर फक्त 12 जून पासून 30 जून पर्यंत मान्य आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :