digit zero1 awards

महागाईचा झटका, AIRTELचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद, द्यावे लागतील जास्त पैसे…

महागाईचा झटका, AIRTELचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद, द्यावे लागतील जास्त पैसे…
HIGHLIGHTS

AIRTELचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद

देशातील 19 सर्कलमध्ये बंद करण्यात आला प्लॅन

या प्लॅनमध्ये यूजर्सना 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो.

AIRTELने आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. हा रिचार्ज प्लॅन 99 रुपयांचा होता. एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन देशातील 19 सर्कलमध्ये बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 155 रुपयांचा झाला आहे. यासाठी वापरकर्त्यांना 56 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. 

हे सुद्धा वाचा : Motorola G31 वर जोरदार सवलत, केवळ 9,499 रुपयांमध्ये 32% डिस्काउंटसह उपलब्ध

'या' सर्कलमध्ये प्लॅन बंद 

AIRTELने शांतपणे आपला 99 रुपयांचा स्वस्त प्लॅन बंद केला आहे. यासाठी एअरटेलने टप्प्याटप्प्याने एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेलने सर्वप्रथम ओडिशा आणि हरियाणामध्ये 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. यानंतर आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि ईशान्येमध्ये देखील बंद करण्यात आला आहे.

या प्लॅनमध्ये यूजर्सना 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. यासाठी वापरकर्त्यांकडून 2.5 पैसे प्रति सेकंद दर आकारला जातो. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, यात 200MB डेटा देखील मिळतो.

आता AIRTELचा स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा

हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 1 GB डेटा देण्यात आला आहे. तसेच, 300SMS सुविधा उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच, विंक म्युझिक आणि हॅलोट्यून्सची मोफत सदस्यता उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo