भारती Airtel भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर आहे. कंपनी ग्राहकांना Amazon Prime Video सबस्क्रिप्शनसह दोन प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. या सबस्क्रिप्शनद्वारे वापरकर्ते Prime Video प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश करू शकतील. याद्वारे त्यांचे आवडते टीव्ही शो आणि चित्रपट देखील पाहू शकतील. याशिवाय, हे दोन्ही प्लॅन ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देखील देतात. चला तर मग 699 रुपये आणि 999 रुपयांच्या दोन्ही प्लॅनबद्दल सर्व माहिती बघुयात-
भारती एअरटेलचा 699 रुपयांचा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100SMS आणि 3GB दैनिक डेटासह येतो. या प्लॅनची सेवा वैधता 56 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये 56 दिवसांसाठी Amazon Prime, Truly Unlimited 5G डेटा, Airtel Extreme Play, Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music यांचा समावेश आहे.
Airtel चा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100SMS आणि 2.5GB दैनिक डेटासह येतो. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची सेवा वैधता उपलब्ध आहे. यासह, वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा, 84 दिवसांसाठी Amazon Prime, Airtel Extreme Play, RewardsMini Subscription, Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music ची सुविधा देखील मिळते.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, वरील 699 आणि 999 प्रीपेड प्लॅन्स Airtel Extreme Play चे देखील सबस्क्रिप्शन ऑफर करतात. हे भारती Airtel द्वारे बनवलेले प्रमुख इन-हाउस OTT प्लॅटफॉर्म आहे. त्याबरोबरच, कंपनीकडे ग्राहकांसाठी Amazon प्राइम ऑफर करणारे इतर प्लॅन्स आहेत, परंतु ते पोस्टपेड श्रेणीतील आहेत. 499 रुपयांपासून ते 1199 रुपयांपर्यंत, सर्व Airtel पोस्टपेड प्लॅन अमर्यादित डेटा आणि Amazon प्राइम सबस्क्रिप्शनसह येतात.