Airtel ने प्रत्येक वापरकर्त्याच्या मागण्या लक्षात घेऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड प्लॅन्स समाविष्ट केले आहेत. या रिचार्जमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी भरपूर हाय-स्पीड डेटाही दिला जात आहे. इतकेच नाही तर, मनोरंजनासाठी OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जात आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel च्या दोन खास प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सुपर फास्ट डेटा मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Airtel च्या या बेस्ट प्लॅनबद्दल सविस्तर माहिती बघुयात-
Airtel च्या या प्रीपेड प्लॅनची वैधता एकूण 56 दिवसांची आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या पॅकमध्ये दररोज 100 SMS सह 3GB डेटा उपलब्ध आहे. विशेषतः या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील दिला जात आहे.
एवढेच नाही तर, प्रीपेड प्लॅनसह Amazon प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शन देखील अगदी मोफत दिले जात आहे. यासह तुम्ही तुमचे फेव्हरेट शोजचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त, विनामूल्य Hello Tune आणि Wynk Music मध्ये प्रवेश देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.
Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन हा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. Airtel च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2.5GB डेटा म्हणजेच एकूण 210GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये 100SMS दिले जात आहेत. या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. तर, मनोरंजनासाठी Amazon प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन या पॅकमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.