रिलायन्स Jio ने अलीकडेच 61 रुपयांमध्ये अतिरिक्त डेटा देण्यासाठी 'डेटा बूस्टर' प्लॅन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे, एअरटेलकडे सुद्धा या किंमत श्रेणीमध्ये 65 रुपयांचा प्लॅन आहे. पण या दोन्ही टेलिकॉम दिग्गजांपैकी कुणाचा प्लॅन तुम्हाला उत्तम बेनिफिट्स देतो? हे जाणून घेण्यासाठी याबाबत सविस्तर माहिती बघुयात.
जिओ प्लॅनची किंमत 61 रुपये आहे.या प्लॅनमध्ये Jio ग्राहकांना 10GB 5G डेटा मिळतो. या रिचार्जसह कॉलिंग किंवा SMS फायदे उपलब्ध नाहीत. 10GB डेटा संपल्यानंतर 64Kbps च्या वेगाने इंटरनेट चालवता येते. या प्लॅनची वैधता तुमच्या विद्यमान प्लॅन एवढीच असणार आहे.
वरील प्लॅनच्या किमंत श्रेणीमध्ये या प्लॅनची किंमत फक्त 65 रुपये आहे. हे एक डेटा व्हाउचर आहे, ज्याद्वारे कंपनी यूजर्सला 4G स्पीडवर डेटा ऑफर करते. या पॅकमध्ये यूजर्सना 4GB डेटा मिळतो. 4GB डेटा कोटा संपल्यानंतर कंपनी वापरकर्त्यांकडून 50 पैसे प्रति MB शुल्क आकारले जाईल.
त्याबरोबरंच, या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉलिंग किंवा SMS ची कोणतीही सुविधा मिळणार नाही. तसेच, वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनची वैधता देखील तुमच्या विद्यमान प्लॅन एवढी आहे.
वरील दोन्ही प्लॅनचे बेनिफिट्स बघता ज्यांना अतिरिक्त आणि जास्त डेटाची गरज त्यांच्यासाठी JIO चा प्लॅन उत्तम ठरेल. पूर्वी या प्लॅनमध्ये देखील 6GB डेटा मिळत होता. पण एका ऑफरअंतर्गत यामध्ये अतिरिक्त 4GB डेटा मिळत आहे. ऑफर संपल्यानंतर हे बेनिफिट्स मिळणार नाही.