Airtel 5G Plan : दीर्घकाळ वैधतेसह डेली 2GB डेटा आणि बरेच बेनिफिट्स, बघा किंमत

Airtel 5G Plan : दीर्घकाळ वैधतेसह डेली 2GB डेटा आणि बरेच बेनिफिट्स, बघा किंमत
HIGHLIGHTS

Airtel Unlimited 5G Plan चे तपशील

प्लॅन Airtel Thanks App किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऍक्टिव्ह करू शकता.

प्लॅनमध्ये वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची वैधता

Airtel देशभरात झपाट्याने 5G नेटवर्कचा विस्तार करत आहे. 5G क्षेत्रातील ग्राहक मनसोक्तपणे 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे आता 5G प्लॅन्सची गरज तयार झाली आहे. आज आम्ही तुम्हाला वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या Airtel Unlimited 5G Plan बद्दल सांगणार आहोत. यामुळे, तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज उरणार नाही. 

या प्लॅनमध्ये शॉर्ट टर्म प्लॅन्सच्या तुलनेत अधिक डेटा मिळतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता एअरटेलच्या वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या 5G प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. या प्लॅनमध्ये तुम्हाला अप्रतिम बेनिफिट्स मिळणार आहेत.

 Airtel चा 2,999 रुपयांचा प्लॅन 

 Airtel ग्राहकांसाठी अमर्यादित 5G प्लॅन ऑफर करत आहे. हा प्लॅन तुम्ही Airtel Thanks App किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऍक्टिव्ह करू शकता. या प्लॅनमध्ये वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळणार आहे. तसेच संपूर्ण वैधतेसह अमर्यादित कॉलिंगदेखील मिळेल. तसेच, 100 SMS देखील तुम्हाला मिळणार आहे. 

इतर फायद्यांमध्ये बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Wynk music चे फ्री सब्स्क्रिप्शन मिळेल. तसेच, Apollo 24/7 Circle सब्स्क्रिप्शन मिळेल, ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला Free Hellotunes चे लाभ देखील मिळणार आहे. याव्यतिरिक्त, FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. या प्लॅनबद्दल अधिक माहिती हवी असेल तर, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo