Airtel 5G Unlimited Data: अप्रतिम बेनिफिट्ससह ‘हे’ जबरदस्त प्लॅन्स, किंमत 500 रुपयांअंतर्गत

Updated on 01-Sep-2023
HIGHLIGHTS

Airtel प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा लाभ मिळतो.

Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळणार आहे.

विशेष म्हणजे या प्लॅन्सची किंमत केवळ 500 रुपयांअंतर्गत आहे.

Airtel युजर्स हा लेख आज आम्ही खास तुमच्यासाठी तयार केला आहे. कंपनीने 5G सर्व्हिस लाँच केल्यापासून कंपनीकडे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये हाय स्पीड 5G डेटा बेनिफिट उपलब्ध आहे. होय, तुम्हाला अमर्यादित 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅन्सची किंमत केवळ 500 रुपयांअंतर्गत आहे. बघा यादी. 

Airtel चा 239 रुपयांचा प्लॅन:

 या प्लॅनमध्ये ग्राहकांना 24 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटा आणि 100 SMS दररोज मिळतात. याशिवाय प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर कॉलिंग मोफत मिळेल. पात्र वापरकर्ते रिचार्जमध्ये 5G स्पीडसह अमर्यादित इंटरनेट डेटाचा लाभ घेऊ शकतात.

Airtel चा 265 रुपयांचा प्लॅन:

 रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये फ्री विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून्सदेखील उपलब्ध आहेत. यात देखील पात्र वापरकर्ते 5G स्पीडसह अमर्यादित इंटरनेट डेटाचा लाभ घेऊ शकतात.

Airtel चा 296 रुपयांचा प्लॅन:

प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, 25GB डेटा, दररोज 100SMS आणि मोफत व्हॉइस कॉलिंगचे फायदे दिले जात आहेत. विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे अपोलो सबस्क्रिप्शनही दिले जाते. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. 

Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन:

या एअरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकचा ऍक्सेस दिला जातो.

Airtelचा 319 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये कॅलेंडर मंथ वैधतेसह अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दररोज 2GB डेटा, 100 SMS/दिवस आणि Wynk Music आणि बरेच काही उपलब्ध आहे.

Airtel चा 359 रुपयांचा प्लॅन:

प्लॅनमध्ये 2GB दैनिक डेटा, मोफत अमर्यादित व्हॉइस, 100 SMS/दिवस, आणि मासिक वैधतेसह Airtel Xstream ऍपसह Wynk म्युझिकमध्ये ऍक्सेस मिळतो.

Airtelचा 399 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, 100 दैनिक SMS आणि विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाइल ऍप सारख्या स्ट्रीमिंग सेवांसाठी विनामूल्य सदस्यता मिळेल. तसेच, Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळणार आहे. 

Airtel चा 479 रुपयांचा प्लॅन:

 या रिचार्जमध्ये दररोज 1.5GB डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. तर, एअरटेल रिचार्ज प्लॅन ग्राहकांना विंक म्युझिक, अपोलो 24/7 सर्कल आणि हॅलोट्यून्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता मिळते. 

Airtel चा 489 रुपयांचा प्लॅन:

प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 50GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 दैनिक SMS आणि मोफत व्हॉइस कॉलिंग फायदे मिळतात. तसेच, त्यात विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे अपोलो सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Airtelचा 499 रुपयांचा प्लॅन:

 या रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा, 100 SMS आणि Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन आणि मोफत व्हॉईस कॉल दिले जातात. रिचार्जची वैधता 28 दिवस आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :