Airtel 5G वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षापूर्वी ‘या’ शहरांमध्ये सेवा सुरू

Updated on 30-Dec-2022
HIGHLIGHTS

भारताच्या उत्तर भागात Airtel 5G सर्व्हिस उपलब्ध

Airtel 5G सेवा 10 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे.

मार्च 2024 पर्यंत Airtel 5G देशाच्या सर्व भागात पोहोचेल.

Airtel 5G सेवेचा हळूहळू विस्तार केला जात आहे. आता या यादीत आणखी दोन शहरांची नावे जोडली गेली आहेत. दूरसंचार कंपनीने भारताच्या उत्तर भागात Airtel 5G देखील उपलब्ध करून दिले आहे. सध्या युजर्सना यासाठी वेगळा प्लॅन घेण्याची गरज भासणार नाही.

हे सुद्धा वाचा : सिनेरसिकांसाठी मनोरंजनाने भरपूर असेल नवे वर्ष! 'हे' प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स OTTवर पदार्पणासाठी सज्ज

Airtel 5G सेवा आता जम्मू आणि श्रीनगरमध्ये सुरू करण्यात आली आहे.आता या भागात राहणारे प्रत्येकजण सुसंगत 5G स्मार्टफोनसह Airtel 5G सेवा वापरू शकतो.यासाठी यूजर्सला एअरटेल 4G सिम अपग्रेड करण्याची गरज नाही.

या लॉन्चसह, Airtel 5G सेवा 10 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे. दूरसंचार कंपनीने म्हटले आहे की, मार्च 2024 पर्यंत Airtel 5G देशाच्या सर्व भागात पोहोचेल. Airtel 5G सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानिपत, गुरुग्राम, गुवाहाटी, पाटणा, लखनौ, शिमला, इंफाळ, अहमदाबाद, वीजाग, विशाखापट्टणम इ. भागांत उपलब्ध आहे.

जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल तर तुम्ही Airtel 5G वापरू शकता. यासाठी तुम्हाला फोनचे नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यातील 5G ​​सेटिंग देखील बदलावी लागेल. यासाठी तुम्हाला फक्त नेटवर्क ऑप्शनवर जाऊन एअरटेल सिम निवडावे लागेल आणि ते पसंतीच्या 5G नेटवर्कवर सेट करावे लागेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :