Airtel 5G Plus सह मिळतात 2 जबरदस्त फायदे, बघा काय आहे खास ?

Airtel 5G Plus सह मिळतात 2 जबरदस्त फायदे, बघा काय आहे खास ?
HIGHLIGHTS

Airtel 5G Plus सेवा देशभरातील 137 शहरांमध्ये उपलब्ध

वापरकर्त्यांची संख्या 1 कोटीच्या पार

Airtel 5G Plus चे दोन फायदे बघा

भारतातील दिग्गज दूरसंचार कंपनी भारती AIRTEL ची 5G सेवा हळूहळू सर्व शहरानमध्ये पसरत चालली आहे. एअरटेल नेटवर्कवरील 5G ​​ग्राहकांची संख्या आता एक कोटीच्या पुढे गेली आहे. एअरटेलने 5G ग्राहकांच्या संख्येबद्दल माहिती दिली आहे. Airtel 5G Plus सेवा देशभरातील 137 शहरांमध्ये Airtel वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या सेवेसोबत ग्राहकांना 2 जबरदस्त लाभ मिळतात. चला बघुयात सविस्तर… 

हे सुद्धा वाचा : Poco C55 ची विक्री आजपासून सुरू, ऑफर्ससह अगदी स्वस्तात खरेदी करा फोन

Airtel 5G Plus चे दोन फायदे 

Airtel 5G Plus सेवा सर्व 5G स्मार्टफोनशी सुसंगत आहे. यासह, टेलिकॉम कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 5G स्पीडचा अनुभव देत आहे, जो 4G स्पीडपेक्षा 20 ते 30 पटीने जास्त आहे.  

Airtel 5G Experience Zones

 आम्ही तुम्हाला सांगतो की Airtel ने देशभरातील 1000 हून अधिक रिटेल स्टोअरमध्ये 5G एक्सपेरियन्स झोन उघडले आहे. तुम्हाला या 5G एक्सपिरियन्स झोनचा काय फायदा होईल, ते बघा… 

आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्याही एअरटेल स्टोअरच्या 5G  एक्सपेरियन्स झोनमध्ये जाऊन अल्ट्रा फास्ट एअरटेल 5G प्लस सुविधा वापरून पाहू शकता.कंपनीची 5G सेवा अल्ट्रा लो लेटन्सी कनेक्शनवर काम करते, ज्याच्या मदतीने तुम्ही काही सेकंदात तुमच्या मोबाइलवर पूर्ण लांबीचा उच्च दर्जाचा व्हिडिओ किंवा चित्रपट डाउनलोड करू शकता.

Airtel 5G सेवा

Airtelने सांगितले की, मार्च 2024 पर्यंत कंपनीची 5G सेवा सर्व महत्त्वाच्या ग्रामीण भागात आणि सर्व शहरांमध्ये विस्तारित केली जाईल. कंपनीने सांगितले की, आतापर्यंत 1 कोटीहून अधिक ग्राहक Airtel 5G नेटवर्कशी जोडले गेले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo