दूरसंचार कंपनी भारती Airtelने सोमवारी देशातील 125 शहरांमध्ये अल्ट्रा-फास्ट 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. 125 नवीन शहरांच्या समावेशासह Airtel 5G Plus सेवा आता देशातील 265 हून अधिक शहरांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात सांगितले की, 5G वापरकर्त्यांच्या बाबतीत 10 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे.
कंपनीने सांगितले की या सर्व 265 क्षेत्रातील वापरकर्त्यांना Airtel 5G Plus चा लाभ मिळेल आणि कंपनीने पुरवलेल्या सर्व सेवा येथे देखील वापरकर्त्यांना उपलब्ध असतील. यादीतील 125 शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 शहरांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा : Vi ने लाँच केला 401 रुपयांचा नवीन प्लॅन, 1 वर्षासाठी मिळेल OTT चे HD सबस्क्रिप्शन
महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, अचलपूर, उदगीर, यवतमाळ शहर, सिन्नर, भंडारा शहर, औरंगाबाद खामगाव, जळगाव, परभणी, ठाणे, बुलढाणा या शहरांमध्ये Airtel 5G नेटवर्क लाँच करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5G रोलआउट मार्च 2024 पर्यंत सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भाग कव्हर करण्याच्या मार्गावर आहे. Airtel 5G Plus सेवा उपलब्धता झपाट्याने विस्तारत राहील, देशातील सर्व शहरे आणि गावे कव्हर करेल, कारण कंपनी देशव्यापी कव्हरेजसाठी काम करत आहे.