Airtelचे 5G डेटा रिचार्ज प्लॅन्स, Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळेल मोफत

Airtelचे 5G डेटा रिचार्ज प्लॅन्स, Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळेल मोफत
HIGHLIGHTS

Airtelचे 5G डेटा रिचार्ज प्लॅन्सची यादी

यामध्ये तुमच्या मनोरंजनाची सुविधा देखील आहे.

दररोज भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध

भारती AIRTEL आपल्या 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार करत आहे. तसेच 5G क्षेत्रातील ग्राहकांना आपोआप 5G नेटवर्कचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, 5G अनलिमिटेड डेटा ऑफर देखील मिळत आहे. चला तर मग आता Airtelच्या 5G डेटा रिचार्ज प्लॅन्सबद्दल थोडा सविस्तर तपशील बघुयात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अगदी मोफतमध्ये Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

AIRTELचा 399 रुपयांचा प्लॅन 

AIRTELचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेली डेटाचा लाभ मिळतो. तसेच दररोज 100 SMS आणि सर्व लोकल, STD आणि रोमिंग नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये तुमच्या मनोरंजनासाठी Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन तीन महिन्यांसाठी मिळेल. 

AIRTELचा 499 रुपयांचा प्लॅन 

तुम्हाला जर जास्त डेटाची आवश्यकता असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 3GB डेली डेटाचा लाभ मिळतो. तसेच दररोज 100 SMS आणि सर्व लोकल, STD आणि रोमिंग नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये तुमच्या मनोरंजनासाठी Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन तीन महिन्यांसाठी मिळेल. तसेच, फ्री हॅलो ट्यूनसारखे अतिरिक्त लाभ देखील मिळतील. 

AIRTELचा 839 रुपयांचा प्लॅन 

दीर्घकाळ वैधता हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळेल. दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळतील. सर्व लोकल, STD आणि रोमिंग नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे.  Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन तीन महिन्यांसाठी यामध्ये दिले जाणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo