प्रसिद्ध टेलिकॉम प्रदाता भारती Airtel ने जुलै महिन्यात आपल्या प्लॅनच्या किमतीत वाढ केली. त्यानंतर, अधिकाधिक युजर्सना आकर्षित करण्यासाठी Airtel वेळोवेळी बाजारात नवीन प्लॅन्स सादर करत असते. त्याबरोरबच, कंपनी आपल्या जुन्या प्लॅन्समध्ये देखील बदल करत असते. यामुळे, आता कंपनीच्या प्रीपेड ते पोस्टपेड प्लॅनमध्ये असंख्य फायदे उपलब्ध आहेत.
जर तुम्ही देखील Airtel चे पोस्टपेड ग्राहक असाल आणि उत्तम प्लॅन्स शोधत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला कंपनीच्या निवडक पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला टेलिकॉम बेनिफिट्ससह OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
Airtel कडे 549 रुपये प्रति महिना खर्चावर पोस्टपेड प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 75GB डेटा डेटा-रोलओव्हर सुविधेसह प्रदान केला हात आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे दिले जातात. या प्लॅनमध्ये तुमच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. होय, या पोस्टपेड प्लॅनमध्ये Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
Airtel च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये फॅमिली ॲड-ऑन सुविधा देण्यात आली आहे. याचा अर्थ वापरकर्ते त्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य या प्लॅनमध्ये जोडू शकतात. यामध्ये, दोन्ही कनेक्शनला डेटा-रोलओव्हरसह 75GB डेटा मिळेल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. याशिवाय पॅकमध्ये 100 SMS देखील दिले जात आहेत. वरील प्लॅनप्रमाणे, या प्लॅनमध्ये देखील वापरकर्त्यांच्या मनोरंजनाची सोय करण्यात आली आहे. होय, या प्लॅनमध्येही Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar OTT ॲपचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, वरील दोन्ही पोस्टपेड प्लॅन्स Airtel च्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून हे पोस्टपेड प्लॅन रिचार्ज करता येतील. याशिवाय, तुम्ही अधिकृत स्टोअरला भेट देऊन सुद्धा हे पोस्टपेड प्लॅन खरेदी करू शकता.