Airtel : ‘या’ प्लॅनमध्ये एका महिन्याच्या वैधतेसह मिळतोय तब्बल 60GB 5G डेटा, पैसावसूल ऑफर

Airtel : ‘या’ प्लॅनमध्ये एका महिन्याच्या वैधतेसह मिळतोय तब्बल 60GB 5G डेटा, पैसावसूल ऑफर
HIGHLIGHTS

Airtel चा 509 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची वैधता 1 महिन्याची आहे.

प्लॅनमध्ये तुम्ही पात्र असल्यास 5G डेटाचा लाभ देखील मिळेल.

भारती Airtel ही सध्या देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. बहुतेक प्लॅन्स 28, 56, 84 आणि 90 दिवसांच्या वैधतेसह येतात, परंतु काही प्लॅन्स एका महिन्याच्या म्हणजे 30 आणि 31 दिवसांच्या वैधतेसह देखील येत आहेत. मासिक प्लॅन्सबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला Airtelच्या अशा प्री-पेड एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एकूण 60GB डेटा मिळतो.

अमर्यादित 5G देखील मिळेल. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Airtel चा हा प्लॅन अमर्यादित 5G डेटासह येतो. कंपनीचे 5G नेटवर्क सध्या देशातील 3,000 शहरांमध्ये लाइव्ह आहे. Airtel चे 5G मार्च 2024 पर्यंत देशभरात लाइव्ह होईल. म्हणजेच जे युजर्स कंपनीच्या 5G क्षेत्रात राहतात आणि ज्यांच्याकडे 5G फोन आहे, त्यांना या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित 5G इंटरनेट मिळेल.  

Airtel चा 509 रुपयांचा प्लॅन 

Airtel च्या या प्लॅनची किंमत 509 रुपये आहे. या प्लॅनमध्ये एकूण 60GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 300SMS देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता 1 महिन्याची आहे, म्हणजे तुम्ही ज्या महिन्याच्या तारखेला रिचार्ज कराल, त्या प्लॅनची वैधता पुढील महिन्याच्या त्याच तारखेला संपेल. 

इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, या Airtel प्लॅनसह, तुम्हाला Apollo 24/7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music चा ॲक्सेस मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo