Airtel 4G या शहरांमध्ये होईल अजून स्ट्रॉंग, VoLTE सर्विस इम्प्रूव होण्याची शक्यता

Airtel 4G या शहरांमध्ये होईल अजून स्ट्रॉंग, VoLTE सर्विस इम्प्रूव होण्याची शक्यता
HIGHLIGHTS

एयरटेल ने देशात 10 सर्कल मध्ये 900MHz स्पेक्ट्रम जारी केला आहे, ज्याबद्दल बोलले जात आहे कि हा इनडोर इंटरनेट कनेक्टिविटी चांगली करण्यास मदत करेल.

भारतात 4g सर्विस सुरु होऊन अनेक वर्षे झाली आहेत. एयरटेल पहिल्या काही टेलिकॉम प्रोव्हायडर्सपैकी एक होता ज्याने भारतात आपली 4G सर्विस सुरु केली होती. कंपनी ने सुरवातीला काही निवडक सर्कल मधेच आपली 4G सर्विस सुरु केली होती, जी नंतर मोठ्या प्रमाणावर रोल आउट करण्यात आली. पण 4G नेटवर्क तेवढा वेगवान नव्हता जेवढा सांगण्यात आला होता. Reliance Jio जास्त वेगवान आणि विश्वसनीय 4G LTE नेटवर्क देत आहे तर एयरटेल आपले 4G नेटवर्क वाढवण्यात आणि क्वालिटी सर्विस देण्याचा प्रयत्न करत आहे. पण आत असे वाटत आहे कि एयरटेल ने आपला 4G नेटवर्क वाढवण्यासाठी कामाची सुरवात केली आहे.

एयरटेल ने देशात 10 सर्कल मध्ये 900MHz स्पेक्ट्रम जारी केला आहे. 900MHz सध्या असलेल्या स्पेक्ट्रम 2300MHz (TD LTE) आणि 1800MHz (FD LTE) मध्ये ऍड केला जाईल. हा रोल आउट सुरवातीला 10 मोठ्या टेलिकॉम सर्कल मध्ये जारी केला जाईल ज्यात दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, नॉर्थ ईस्ट आणि आसाम यांचा समावेश आहे.

सर्व सर्कल्स मध्ये नवीन स्पेक्ट्रम जारी करण्यास थोडा वेळ लागेल. मेट्रो सिटीज मध्ये इतर सर्कल्सच्या तुलनेत नवीन नेटवर्क आधी येण्याची शक्यता आहे. एयरटेल ने इतर सर्कल्ससाठी स्पेक्ट्रम रोलआउटची वेळ निर्धारित केलेली नाही. शक्यता आहे कि 900MHz बँड यावर्षीच्या शेवटापर्यंत एक्टिव केला जाईल.
900MHz स्पेक्ट्रम चा सर्वात मोठा फायदा असा असेल कि एयरटेल 4G सब्सक्राइबर्सना इनडोर इंटरनेट कनेक्टिविटी मध्ये सुधार मिळेल. 900MHz बँड फास्ट 4G इंटरनेट स्पीड एक्सेस करणाऱ्या यूजर्सना घर, शॉपिंग मॉल्स आणि ऑफिस इत्यादी मध्ये चांगला स्पीड मिळेल.

हि रिलायंस जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेलची मोठी चाल आहे. जियो सध्या आपल्या सब्सक्राइबर्सना किफायती किंमतीती चांगली 4G सर्विस देत आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo