एअरटेलने चार नवीन प्लॅन लाँच केले आहेत, दोन रेट कटिंग प्लॅन आणि दोन स्मार्ट रिचार्ज आहेत. हे प्लॅन्स 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. या चार रिचार्ज प्लॅनपैकी दोन नवीन स्मार्ट रिचार्ज ऑप्शन आहेत. सर्व नवीन लाँच केलेल्या रेट कटर प्लॅनची किंमत 140 रुपयांपेक्षा कमी आहे. सर्वात कमी किंमतीचा प्लॅन 109 रुपयांचा आहे, तर सर्वात जास्त किमतीचा प्लॅन 131 रुपयांचा आहे. ज्यांना कमी खर्च करून आपला मोबाईल नंबर सक्रिय ठेवायचा आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स उत्तम आहेत. 109 आणि 111 रुपयांचा प्लॅन सध्याच्या 99 रुपयांचा प्लॅनपेक्षा अधिक वैधता आणि मोबाईल डेटा देतात. चला तर जाणून घेऊयात नवीन प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : जबरदस्त लूक आणि फीचर्ससह Boult च्या दोन स्मार्टवॉच लाँच, किंमत 1,500 रुपयांपेक्षा कमी
एअरटेलच्या 109 रुपयांच्या रेट कटर प्लॅनची वैधता एकूण 30 दिवसांची आहे. हे 200MB मोबाइल डेटा आणि 99 रुपयांच्या टॉक-टाइमसह येते. लोकल, STD आणि लँडलाइन व्हॉईस कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे मोजावे लागतील. SMS साठी, 1 रुपये प्रति लोकल SMS आणि 1.44 रुपये प्रति STD SMS भरावे लागतील.
Airtelचा 111 रुपयांचा स्मार्ट रिचार्ज तुम्हाला 99 रुपये टॉकटाइम आणि 200 MB मोबाइल डेटा देतो. हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये लोकल-STD आणि लँडलाइन कॉलची किंमत प्रति सेकंद 2.5 रुपये असेल. लोकल SMS 1 रुपये आणि STD 1.5 प्रति SMS असेल.
128 रुपयांचा एअरटेल प्लॅन 30 दिवसांसाठी वैध आहे. तुमच्याकडून स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि राष्ट्रीय व्हिडिओ कॉलसाठी 5 रुपये प्रति सेकंद शुल्क आकारले जाईल. वापरलेल्या मोबाइल डेटासाठी रुपये 0.50/MB शुल्क आकारले जाते.
एअरटेलचा 131 रुपयांचा पॅक एका महिन्यासाठी वैध आहे. वापरकर्त्यांना स्थानिक आणि STD कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि राष्ट्रीय व्हिडिओ कॉलसाठी प्रति सेकंद 5 रुपये आकारले जातात. स्थानिक SMSची किंमत 1 रुपये आणि STD ची किंमत प्रति SMS 1.5 रुपये आहे. वापरकर्त्याकडून प्रति MB डेटा 0.50 रुपये आकारले जातात.