Airtel चा जबरदस्त 301 रूपयांचा प्लॅन, मिळतोय तब्बल 50GB डेटा

Updated on 10-May-2023
HIGHLIGHTS

Airtel चा 301 रूपयांचा प्लॅन

दैनिक मर्यादेची चिंता करण्याची गरज नाही.

इतर कंपन्यांकडे ही Airtel सारखे प्लॅन्स

Airtel कडे असे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे तुम्हाला अधिक डेटा लाभ देतात. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल संगणात आहोत. या प्लॅनची किंमत 301 रुपये आहे. हा एक इंटरनेट डेटा प्लॅन आहे. बघुयात प्लॅनची वैधता आणि अप्रतिम बेनिफिट – 

Airtel चा 301 रूपयांचा प्लॅन

 वर सांगितल्याप्रमाणे हा एक इंटरनेट डेटा प्लॅन आहे. यामध्ये यूजर्सना 50GB डेटा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या डेटासाठी कोणतीही दैनिक मर्यादा दिलेली नाही. या प्लॅनची वैधता तुमच्या विद्यमान प्लॅनच्या वैधते एवढी असणार आहे. 

डेटा मर्यादा संपल्यानंतर, युजर्सना 50 पैसे प्रति MB ने शुल्क भरावे लागेल. इतर लाभांबद्दल बोलायचे झाल्यास, यात विंक म्युझिक प्रीमियमचा ॲक्सेस देखील दिला जात आहे. 

यांसारखेच इतर कंपन्यांचे प्लॅन्स

Jio चा 222 रुपयांचा प्लॅन: Jio 222 रुपयांचा प्लॅन देखील 50GB डेटा देत आहे. या प्लॅनची वैधता देखील  विद्यमान प्लॅनसारखीच असेल. यामध्ये कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही. संपूर्ण डेटा संपल्यानंतर 64Kbps पर्यंत डेटा स्पीड कमी होईल.

Vi चा 298 रुपयांचा प्लॅन: यामध्ये देखील यूजर्सना 50GB डेटा मिळेल. मात्र, या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. हे वर्क फ्रॉम होम पॅक आहे. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV क्लासिकचा ॲक्सेस दिला जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :