Airtel plan
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. लोकप्रिय टेलिकॉम कंपनीने कमी किमतीत एक उत्तम प्लॅन आणला आहे. या योजनांमध्ये, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना JioHotstar मोफत देत आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये डेटासारखे फायदे देखील दिले जातात. हे नवे प्लॅन्स कंपनीने जवळपास 300 रुपयांमध्ये लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना तीन महिने म्हणजेच 90 दिवसांची वैधता मिळत आहे. विशेष म्हणजे कंपनीने आयपीएल प्रेमींसाठी हे प्लॅन आणले आहेत.
होय, JioHotstar वर IPL 2025 पाहण्यास इच्छुक असलेले वापरकर्ते या मोबाइल प्लॅनची सदस्यता घेऊ शकतात. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सामन्याचा आनंद घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात Airtel च्या नवीन प्लॅन्सची किंमत-
Airtel च्या नवीन 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी वापरकर्त्यांना 30 दिवसांसाठी म्हणजेच एक महिन्यासाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 5GB मोबाईल डेटा मिळतो. या प्लॅनची देखील वैधता संपूर्ण एका महिन्याची आहे.
Airtel च्या या प्लॅनमध्ये कंपनी वापरकर्त्यांना 15GB मोबाइल डेटा देत आहे. तसेच, वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel च्या या प्लॅनची वैधता 90 दिवसांची म्हणजेच संपूर्ण तीन महिन्यांची वैधता ऑफर केली जाते.
Airtel चा हा नवीन 301 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन या यादीतील सर्वात महाग प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना यामध्ये इतर दोन नवीन प्लॅनपेक्षा दररोज 1GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, त्याच्या वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. एवढेच नाही तर डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS देखील मिळतात. यासह, हॅलोट्यून्स देखील मोफत दिले जातात.