Airtel ही भारतीय दूरसंचार दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. Airtel कंपनी आपल्या नेटवर्कपेक्षा महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी बाजारात ओळखली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel च्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिरिक्त बेनिफिट्स मिळतात. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा 3 डेटा व्हाउचरची माहिती देणार आहोत, जे तुम्हाला एकाच वेळी 20 पेक्षा जास्त OTT चे मोफत सबस्क्रिप्शन देतात.
खरं तर, आपणा सर्वांनाच माहिती आहे की, कंपनी Airtel Xstreme Play नावाची एक सेवा सादर करते. या सेवेअंतर्गत, तुम्हाला SonyLiv, Eros Now, Chaupal, HoiChoi, Lionsgate Play सारख्या अनेक OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. आता कंपनीने सध्याच्या प्लॅन्समध्ये Airtel Xstream Play सेवा मोफत केली आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील प्लॅन्ससह मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळेल.
Airtel चे 181 रुपयांचा डेटा प्लॅन म्हणजेच कंपनीचे डेटा व्हाउचर आहे. हा प्लॅन तुम्हाला Airtel Xstream Play सोबत 15GB डेटा आणि 20 पेक्षा जास्त OTT सबस्क्रिप्शन प्रदान करतो. हा प्लॅन तुमच्या विद्यमान प्लॅनच्या वैधतेच्या आधारावर कार्य करतो. म्हणजेच, या प्लॅनसाठी तुम्हाला आणखी एक बेसिक प्लॅनची आवश्यकता आहे.
Airtel च्या या डेटा व्हाउचरमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची वैधता मिळते. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 मोफत SMS ची सुविधा दिली जात आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये मोफत Airtel Xstream Play चे सब्स्क्रिप्शन देखील मिळेल.
Airtel चा 838 रुपयांचा प्लॅन सर्वात महागडा प्लॅन आहे, ज्याची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा, कॉलिंग, दररोज 100 मोफत SMS ची सुविधा मिळेल. तर, Airtel Xstream Play चे सबस्क्रिप्शन देखील यात उपल्बध आहे. त्याबरोबरच, विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये यूजर्सना Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.