जर तुम्ही AIRTEL वापरकर्ते असाल आणि वार्षिक आणि मासिक रिचार्ज प्लॅनबद्दल तुम्ही गोंधळात असाल तर तुम्ही कोणत्या प्लॅनचे रिचार्ज करावे? कारण वार्षिक प्लॅन्स खूप महाग असतात. त्या तुलनेत मासिक प्लॅन्स स्वस्त आहेत. परंतु संपूर्ण वर्षाची वैधता बघितली तर वार्षिक प्लॅनचं उत्तम ठरतो. तसेच, वार्षिक प्लॅन रिचार्जची किंमत मासिक प्लॅन्सपेक्षा कमी आहे. गोंधळ परत वाढला? चला तर मग बघुयात वर्षभराच्या वैधतेसह AIRTELचा परवडणारा प्लॅन…
हे सुद्धा वाचा : पैसावसूल ऑफर ! OnePlus Nord CE 2 Lite 5G वर प्रचंड सवलत, स्वस्तात महागडा फोन घेण्याची संधी
AIRTEL चा 2,999 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षाची वैधता ऑफर करतो. या प्लॅनमध्ये मासिक खर्च सुमारे 250 रुपये येतो.
मात्र, AIRTELच्या 265 रुपयांच्या मासिक प्लॅनच्या तुलनेत, 250 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये अधिक डेटा आणि इतर अनेक अतिरिक्त ऑफर आहेत. Airtel च्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 मोफत SMS दिले जातात.
एअरटेलच्या 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा दिला जात आहे. तसेच ऍप एक्सक्लुझिव्ह 2 GB डेटा कूपन दिले आहे. याशिवाय HelloTunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. कॉलिंगसाठी अमर्यादित लोकल आणि STD मिनिटे दिली जातात. यासोबतच दररोज 100 SMS ची सुविधाही देण्यात आली आहे.
एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनच्या तुलनेत, 265 रुपयांचा मासिक प्लॅन सुमारे 11 महिन्यांची वैधता देतो. तर वार्षिक प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षाची वैधता मिळते. म्हणूनच AIRTEL 2,999 रुपयांचा प्लॅन हा अधिक परवडणारा प्लॅन आहे.