Airtel कडून युजर्सना मिळालं मोठं गिफ्ट! दररोज अगदी मोफत मिळतोय 500MB अतिरिक्त डेटा

Airtel कडून युजर्सना मिळालं मोठं गिफ्ट! दररोज अगदी मोफत मिळतोय 500MB अतिरिक्त डेटा
HIGHLIGHTS

Airtelने आपल्या यूजर्ससाठी एक खास भेट आणली आहे.

स्वस्त प्लॅनमध्ये बेनिफिट कंपनीने 500MB ने वाढवला आहे.

या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटाचा ऍक्सेस मिळणार आहे.

Airtel ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज कंपनी आहे. ही कंपनी आपल्या महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. कंपनीकडे किफायतशीर किंमत श्रेणीपासून महागडे प्लॅन्स उपलब्ध आहेत.  मात्र, Airtel युजर्ससाठी आम्ही आज खास माहिती घेऊन आलो आहोत. आता Airtelने आपल्या यूजर्ससाठी एक खास भेट आणली आहे. खरं तर, आता एअरटेलने सध्याच्या स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन अंतर्गत उपलब्ध फायदे वाढवले ​​आहेत. या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. संपूर्ण माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा. 

नवीन फायद्यांसह 299 रुपयांचा प्लॅन 

 Airtel कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 299 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा कंपनीची नवीन नाही तर जुनाच प्लॅन आहे. मात्र, आता कंपनीने या प्लॅन अंतर्गत मिळणारे बेनिफिट्स वाढवले ​​आहेत. याआधी कंपनी या प्लॅन अंतर्गत यूजर्सना दररोज 1.5GB डेटा ऍक्सेस देत होती. पण आता हा बेनिफिट कंपनीने 500MB ने वाढवला आहे. आता या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटाचा ऍक्सेस मिळणार आहे. 

airtel

या प्लॅनमध्ये उपलब्ध इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel चा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग लाभ समाविष्ट आहे, जेथे वैधतेदरम्यान कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगचा आनंद घेता येईल. तसेच, युजर्सना दररोज 100 मोफत SMS ची सुविधाही मिळते.

जवळपास किंमत श्रेणीत येणार प्लॅन 

 Airtel आपल्या पोर्टफोलिओमध्ये 319 रुपयांचा प्लॅन देखील आणते. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा देखील मिळतो. हा प्लॅन वरील प्लॅनप्रमाणेच संपूर्ण फायदे देतो. या प्लॅनमध्ये सुद्धा अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMSची सुविधा आहे. मात्र, फरक फक्त इतका की हा प्लॅन 28 दिवसांऐवजी 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo