300 रुपयांपेक्षा कमी किमतीत AIRTELचे दोन प्लॅन्स, कोणता ठरेल तुमच्यासाठी बेस्ट ?

Updated on 09-Mar-2023
HIGHLIGHTS

AIRTELचे 265 आणि 239 रुपयांचे रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये केवळ 26 रुपयांचा फरक

अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि मनोरंजनाची देखील सोय

Airtel कडून अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. Airtel चे काही स्वस्त प्लॅन्स तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. एअरटेलचे हे रिचार्ज प्लॅन 265 आणि 239 रुपयांचे आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा आणि कॉलिंग मिळते. मात्र, या प्लॅनमध्ये वेगवेगळ्या दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, अनेक OTT ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : Nothing Phone (1) खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळतेय थेट 9 हजारांची सूट

AIRTEL चा 239 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये एकूण 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, हा प्लॅन 1 GB डेटासह येतो. यामध्ये 24 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, मोफत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिक सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

AIRTEL चा 265 रुपयांचा प्लॅन

AIRTEL च्या 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, मोफत Hello Tune आणि Wynk Music सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

AIRTEL चा 265 रुपयांचा प्लॅन 239 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 26 रुपये अधिक आहे. या प्लॅनमध्ये केवळ 26 रुपयांमध्ये अधिक दिवसांसाठी अतिरिक्त डेटा आणि कॉलिंग सुविधा दिली जात आहे. यामध्ये 4 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसह 4GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त वैधता आणि डेटाची गरज असेल तर 265 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य प्लॅन असेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :