भारती Airtel भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स आहेत. मात्र, आपण सामान्य युजर्सकडून नेहमीच ऐकत असतो की, Airtel चे प्लॅन्स महाग असतात. हा कंपनीच्या प्लॅन्सबद्दल एक सामान्य समज आहे. मात्र, जर तुम्ही कंपनीच्या प्लॅनची यादी पाहिल्यास तुम्हाला अनेक स्वस्त आणि परवडणारे प्लॅन्स दिसतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel च्या 211 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.
Airtel च्या या प्लॅनची किंमत फक्त 211 रुपये इतकी आहे. दररोज डेटा बेनिफिटसह येणारा Airtel चा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. त्याबरोबरच, हा प्लॅन तुम्हाला संपूर्ण महिन्याची वैधता देखील देतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel चा हा प्लॅन सम्पुर्ण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच, या प्लॅनअंतर्गत उपलब्ध असलेले सर्व फायदे 30 दिवसांसाठी म्हणजे 1 महिन्यासाठी वैध असतील.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा ऍक्सेस मिळेल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळेल. हा प्लॅन तुम्हाला 30 दिवसांसाठी 30GB डेटा ऍक्सेस प्रदान करतो. दीर्घ वैधता आणि दैनिक डेटा व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे मिळणार नाहीत. तुम्ही महिनाभर चालणारा आणि रोजचा डेटा देणारा परवडणारा प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन खास तुमच्यासाठी आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
जर तुम्हाला डेटासह कॉलिंग आणि SMS चे बेनिफिट्स देखील हवे असतील तर, यासाठी कंपनीकडे आणखी एक स्वस्त प्लॅन आहे. तुम्ही Airtel चा 219 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. नियमित टेक्स्ट मेसेजिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते दररोज 100SMS चे बेनिफिट्स देतात.