Airtelच्या ‘या’ 2 प्लॅन्समुळे युजर्स झाले खुश, Jio-Viकडे देखील असा रिचार्ज प्लॅन नाही

Updated on 13-Jun-2022
HIGHLIGHTS

Airtel चा 699 आणि 999 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये Amazon प्राइम मेंबरशिप मोफत

Jio-Viकडे देखील असा बेनिफिट उपलब्ध नाही

देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Bharti Airtel कडे Jio आणि Vodafone Idea (Vi) सारखे अनेक प्लॅन्स आहेत. बहुतेक प्लॅन्स इतर दोन कंपन्यांच्या प्लॅन्ससोबत जुळतात, मात्र एअरटेलकडे अशा काही योजना देखील आहेत ज्या बाकीच्यांपेक्षा वेगळ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे बेनिफिट्स Jio किंवा Vi कडे नाहीत.

Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन

पहिला प्लॅन 699 रुपयांचा आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 168 GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील दिले जातात. 

हे सुद्धा वाचा: भारीच की! Mi Smart TV वर बंपर डिस्काउंट, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन

त्याचप्रमाणे, कंपनीचा 999 रुपयांचा एक अनोखा प्लॅन आहे, ज्यामध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील दिले जातात. विशेष म्हणजे तुम्हाला 699 आणि 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये Amazon प्राइम मेंबरशिप मोफत दिली जात आहे. पहिल्या प्लॅनमध्ये 56 दिवस आणि दुसऱ्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची मेंबरशिप दिली जाईल. याशिवाय,  यूजर्सना यामध्ये Airtel Xstream Mobile Pack, Apollo 24/7 Circle, Free HelloTunes आणि Wink Music Free सारखे फीचर्स देखील मिळतात.

Jio प्लॅन्स

Jio कडे असा कोणताही प्रीपेड प्लॅन नाही, ज्यामध्ये तुम्हाला Amazon Prime मोफत मिळेल. या किमतीच्या रेंजमध्ये Jio चे 659 रुपये आणि 1066 रुपयांचे दोन प्लॅन आहेत. जिथे 659 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा, कॉलिंग आणि Disney + Hotstar मिळत आहे. तर, 1,066 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनसह 2 GB डेटा आणि 84 दिवसांसाठी दररोज अमर्यादित कॉलिंग मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :