Airtelचा पैसावसूल प्लॅन ! डेटासह मिळतील OTT बेनिफिट्स, किंमत 149 रुपये

Updated on 18-Apr-2023
HIGHLIGHTS

Airtel चा 149 रुपयांचा प्लॅन

15 पेक्षा जास्त OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन

जास्त डेटा हवा असल्यास याच किंमत श्रेणीत अजून एक प्लॅन

टेलिकॉम दिग्गज Airtel ने एक खूप आकर्षक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन त्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे, जे वापरकर्ते सिनेरसिक आहेत. तसेच, OTT प्लॅटफॉर्म्सचे लव्हर्स आहेत. कारण या नव्या प्लॅनमध्ये कमी किमतीत तुम्हाला OTT सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. त्याबरोबरच, डेटा लाभदेखील यासह उपलब्ध असणार आहे. 

Airtel चा 149 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता तुमच्या विद्यमान प्लॅन सारखीच असणार आहे. विशेष या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांसाठी Xstream Premium चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel Extreme Premium मध्ये एकाच ऍपमध्ये 15 पेक्षा जास्त OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळते. 

वापरकर्ते टॅबलेट, स्मार्टफोन आणि डेस्कटॉपवर या सर्व 15 OTT ऍप्सचे कंटेंट पाहू शकतात. Airtel Extreme Premium चे सबस्क्रिप्शन संपूर्ण एका महिन्यासाठी असेल. कंपनी आपल्या  Xstream Premium सुविधेचा ऍडॉप्शन वाढवायण्यासाठी असे प्लॅन ऑफर करत आहे, असे म्हटले जात आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही Airtel च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता. 

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही कंपनीच्या 148 रुपयांच्या प्लॅनसह जाऊ शकता. 

Airtel चा 148 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 15GB डेटाचा लाभ मिळणार आहे, मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणतेही OTT सब्स्क्रिप्शन बेनिफिट मिळणार नाही.  

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :