Airtel Extreme Premium मध्ये कंपनी वापरकर्त्यांना एकाच ऍपमध्ये 15 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचा लाभ देते.
दूरसंचार कंपनी Airtel ने आपल्या वापरकर्त्यांसाठी कमी किमतीचा OTT बेनिफिट प्लॅन आणला आहे. जर तुम्ही देखील OTT प्रेमी असाल आणि कमी किमतीच्या डेटासह OTT चा लाभ घेऊ इच्छित असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला किती दिवसांची वैधता आणि कोणते फायदे मिळणार आहेत, ते बघुयात…
149 रुपयांच्या या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये फक्त 1 GB हाय स्पीड डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वेगळी वैधता नाही कारण हा कंपनीचा डेटा प्लॅन आहे. डेटा प्लॅन म्हणजेच हा पॅक रिचार्ज केल्यावर तुम्हाला तुमच्या विद्यमान प्लॅनसह अतिरिक्त डेटाचा लाभ मिळेल.
1 GB हायस्पीड डेटासह कंपनी 30 दिवसांच्या वैधतेसह एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमचे वापरकर्त्यांना विनामूल्य ऍक्सेस देईल. Airtel Extreme Premium हे कंपनीचे OTT कंटेंट प्लॅटफॉर्म आहे, जे वापरकर्त्यांना एकाच ऍपमध्ये 15 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचा लाभ देते.
Airtel चा 148 रुपयांचा प्लॅन
कंपनीकडे 148 रुपयांचा देखील एक प्लॅन आधीपासून आहे. तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असल्यास आणि तुम्ही OTT प्रेमी नसल्यास, तुम्हाला कंपनीचा 148 रुपयांचा प्लॅन खरेदी करता येईल. या रिचार्ज प्लॅनसह कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 15 GB डेटा देत आहे, या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमच्या विद्यमान प्लॅनच्या समान वैधता मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.