Airtel कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये हाय स्पीड डेटा ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता कंपनीने आपल्या विद्यमान प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. होय, Airtel कंपनीने आपले दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. या दोन्ही प्लॅनची किंमत 118 रुपये आणि 289 रुपये इतकी आहे. मात्र, आता तुम्हाला या दोन्ही प्लॅनसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. चला तर मग जाणून घेऊयात या प्लॅनची नवी किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
लक्षात घ्या की, Airtel चा 118 रुपयांचा डेटा प्लॅन आहे. तर, 289 रुपयांचा प्लॅन हा ट्रू अनलिमिटेड प्लॅन होय. आता या दोन्ही प्लॅनच्या किमतीत वाढ झाली आहे. नवीन किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 118 रुपयांच्या प्लॅनसाठी 129 रुपये द्यावे लागतील. तर, 289 रुपयांच्या प्लॅनची किंमत 329 रुपये इतकी करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात दोन्ही प्लॅन्सचे बेनिफिट्स.
Airtel चा 118 रुपयांचा प्लॅन एक डेटा व्हाउचर आहे, जो आता 129 रुपयांचा झाला आहे. Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 12GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कोणतीही वैधता उपलब्ध नाही. या प्लॅन अंतर्गत उपलब्ध 12GB डेटा वापरण्यासाठी, तुम्हाला एक वेगळा बेस प्लॅन लागेल, ज्यामध्ये तुम्हाला वैधतेसह कॉलिंग आणि SMS बेनिफिट्स देखील मिळतील.
Airtel चा 289 रुपयांचा प्लॅन आता 329 रुपयांचा झाला आहे. या प्लॅनमध्ये 35 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 4GB डेटा मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये अनलिमिटेड टॉकटाइम देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही अखंड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300SMS फ्री मिळतात. त्याबरोबरच, Apollo 24|7 सर्कल सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक इ. देखील समाविष्ट आहे.