दूरसंचार कंपन्या विविध प्रकारच्या योजना ऑफर करतात. एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही समाविष्ट आहेत. जर आपण प्रीपेड ग्राहकांबद्दल बोललो, तर कंपनी ट्रूली अनलिमिटेड, क्रिकेट प्लॅन, स्मार्ट रिचार्ज, डेटा, टॉकटाइम (टॉपअप) यासह अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते.
हे सुद्धा वाचा : सोशल मीडियावर स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल? या 5 महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा
जर तुम्ही एअरटेल प्रीपेड यूजर असाल तर तुम्ही कंपनीचे अनेक प्लॅन वापरून बघू शकता. पण सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तो टॉपअप म्हणजेच टॉक टाइम प्लॅन आहे. कंपनी टॉकटाइम प्लॅन फक्त रु. 10 च्या सुरुवातीच्या किमतीत देते. म्हणजेच, तुम्हाला तुमचा फोन 10 रुपयांमध्ये रिचार्ज करता येईल.
Airtel तुम्हाला 10 रुपयांमध्ये 7.47 रुपयांचा टॉकटाइम देते. या टॉकटाइमचा वापर कॉलिंग, इंटरनेट आणि SMS साठी करता येईल. म्हणजेच 10 रुपयांमध्ये तुम्हाला तुमच्या एअरटेल सिमवरून कॉल, डेटा किंवा SMS करता येईल.
मात्र, यासाठी तुम्हाला स्टँडर्ड चार्जेस भरावे लागतील. केवळ 10 रुपयांचाच नाही तर कंपनी इतरही अनेक प्लॅन ऑफर करते. २० रुपयांमध्ये तुम्हाला १४.९५ रुपयांचा टॉकटाइम मिळेल.तर 100 रुपयांच्या टॉपअपवर तुम्हाला 81.75 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. तुम्ही Airtel मध्ये 5000 रुपयांपर्यंतचा टॉकटाइम रिचार्ज करू शकता.
कंपनी स्मार्ट रिचार्ज देखील देते. एअरटेलच्या स्मार्ट रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला 99 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे कंपनीच्या या प्लानची किंमत देखील 99 रुपये आहे. म्हणजेच त्यात तुम्हाला पूर्ण टॉकटाइम मिळतो. वापरकर्ते 200MB डेटा, लोकल SMS 1 रुपये आणि 1.5 रुपयांमध्ये करू शकतात.