दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून व्हा मुक्त! Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळेल 730GB डेटा, विशेष बेनिफिट उपलब्ध

दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून व्हा मुक्त! Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळेल 730GB डेटा, विशेष बेनिफिट उपलब्ध
HIGHLIGHTS

Airtel च्या पोर्टफोलिओमध्ये विविध श्रेणी आणि बेनिफिट्ससह प्रीपेड प्लॅन्स आहेत.

Airtel च्या वार्षिक प्लॅनमध्ये प्रचंड डेटा लाभ उपलब्ध आहे.

Airtel च्या या प्लॅनमध्ये स्पॅम फाइटिंग नेटवर्कचा सपोर्ट मिळणार आहे.

भारती Airtel ही भारतातील दुसरी आघाडीची दूरसंचार कंपनी आहे. Airtel च्या पोर्टफोलिओमध्ये विविध श्रेणी आणि बेनिफिट्ससह प्रीपेड प्लॅन्स आहेत. Airtel नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन बेनिफिट्स आणि सोयींसह प्लॅन्स सादर करत असते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा डेटा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 730GB डेटा आणि लाइव्ह TV चा एक्सेस मिळेल. हा प्लॅन रिचार्ज करून तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त व्हाल. जाणून घेऊयात तपशील-

airtel annual plan
airtel annual plan

Airtel Plan

कथित Airtel या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 3599 रुपये आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. अशाप्रकारे, या प्लॅनमध्ये वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 730GB डेटा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 100SMS दिले जात आहेत. या पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवस म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची आहे. प्लॅन खरेदीसाठी क्लिक करा!

हा रिचार्ज प्लॅन एका विशेष बेनिफिटसह येतो. Airtel ला या प्लॅनमध्ये स्पॅम फाइटिंग नेटवर्कचा सपोर्ट मिळणार आहे. या नव्या सुविधेमुळे घोटाळेबाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. याशिवाय, Airtel Xstreme App चे सबस्क्रिप्शनदेखील या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. यासह तुम्ही लाइव्ह TV शो देखील पाहण्यास सक्षम असाल. तसेच, Apollo 24*7 चे ऍक्सेस देखील उपलब्ध आहे. हा रिचार्ज प्लॅन कंपनीच्या अधिकृत ॲप आणि वेबसाइटवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.

Airtel

अलीकडेच लाँच झाले नवे डेटा पॅक्स

जर तुमच्या बेस प्लॅनमधील दैनंदिन डेटा मर्यादा संपली असेल तर, कंपनीने अलीकडेच नवे डेटा पॅक्स देखील लाँच केले आहेत. या नव्या डेटा पॅकची किंमत 161 रुपये, 181 रुपये आणि 351 रुपये इतकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या डेटा पॅकमध्ये तब्बल 50GB पर्यंत डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये वैधता सुविधा देखील उपलब्ध असेल. मात्र, कॉलिंग आणि SMS सारख्या बेनिफिट्ससाठी वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo