मोबाईल ऑपरेटर कंपनी एयरसेलने ग्राहकांसाठी एक नवीन अनलिमिटेड डेटा ऑफर आणली आहे. ही नवीन ऑफर १ डिसेंबरपासून लागू झाली आहे. एयरसेलने अनलिमिटेड डेटा ऑफर 2G आणि 3G या दोन्ही ग्राहकांसाठी आणली आहे. विशेष गोष्ट म्हणजे कमी किंमतीतील डेटा पॅक लाभ केवळ प्री-पेड ग्राहकच घेऊ शकतात.
ह्याविषयी एयरसेलने नॅशनल हेड सुनील कट्टम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “आम्ही प्री-पेड ग्राहकांसाठी ६० टक्क्यांपर्यंत डेटा टॅरीफमध्ये घट केली आहे, तथापि पोस्टपेड ग्राहकांना 64KBPS च्या गतीने मोफत इंटरनेट उपलब्ध होईल.”
एयरसेलने ह्या अनलिमिटेड डेटा ऑफरची किंमत ९ रुपये, ७८ रुपये आणि १३४ रुपये अशी ठेवली आहे. अनलिमिटेड डाटा ऑफरच्या द्वारे ९ रुपयाच्या डेटा पॅकवर ग्राहक 2G आणि 3G नेटवर्कवर एका दिवसासाठी 100MB डेटाचा उपयोग करु शकतात. तर ७८ रुपयाच्या पॅकवर १० दिवसांसाठी १जीबीचा डेटा उपलब्ध होईल.
त्याचबरोबर एयरसेल अनलिमिटेड डेटा ऑफरसाठी २४९ रुपयाच्या डेटा पॅकमध्ये 3G उपभोक्ता ३० दिवसात 3GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. त्याशिवाय ४०३ रुपयांत ७.५ जीबी च्या अनलिमिटेड डेटाचा उपयोग केला जाऊ शकतो, ज्याची वैधता १५ दिवसांची आहे.