दरवाढीनंतर Jio, Airtel आणि Vodafone Idea चा सर्वात Affordable मासिक प्लॅन्स, जाणून घ्या बेनिफिट्स 

दरवाढीनंतर Jio, Airtel आणि Vodafone Idea चा सर्वात Affordable मासिक प्लॅन्स, जाणून घ्या बेनिफिट्स 
HIGHLIGHTS

Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea ने मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या दरवाढीची घोषणा

तिन्ही कंपन्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमतीत सुमारे 25% वाढ

3 आणि 4 जुलैपासून Airtel, Reliance Jio आणि VI प्लॅन्सवर नवे दर लागू होणार

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea ने मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या दरवाढीची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत या सर्व कंपन्यांसाठी सर्वात स्वस्त किंवा परवडणारा प्रीपेड प्लॅन कोणता असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्या म्हणजेच 3 जुलैपासून प्लॅन्सवर नवे दर लागू होणार आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, जो तिन्ही कंपन्यांकडे एकाच किमतीत उपलब्ध आहे.

Jio, Airtel आणि Vodafone Idea चे प्लॅन्सचे नवे दर

रिलायन्स Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यानी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमतीत सुमारे 25% वाढ घोषित केली आहे. रिलायन्स Jio आणि Airtel च्या ग्राहकांसाठी 3 जुलैपासून आणि Vodafone Idea च्या ग्राहकांसाठी 4 जुलैपासून प्लॅन्सचे नवे दर लागू होणार आहेत.

तिन्ही कंपन्यांकडे 199 रुपयांचा सर्वात स्वस्त मासिक प्लॅन आहे. होय, ग्राहक हा प्लॅन 199 रुपयांना खरेदी करू शकतात. म्हणजेच, आता तुम्हाला प्रीपेड रिचार्जसाठी किमान 199 रुपये द्यावे लागतील.

Reliance Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

Reliance Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

आत्तापर्यंत Reliance Jio कडून सर्वात स्वस्त मासिक प्लॅन म्हणून 155 रुपयांचा प्लॅन ऑफर केला जात होता. मात्र उद्यापासून या प्लॅनची ​​किंमत तब्बल 44 रुपयांनी वाढणार आहे. यानंतर, हा मासिक प्लॅन ग्राहकांना 199 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल. किंमत वाढत असली तरी या प्लॅनमधील फायदे पूर्वीसारखेच असतील.

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये 2GB 4G डेटा दिला जाणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये 300SMSचा लाभही उपलब्ध आहे. तसेच, विना अडथडा कॉलिंग करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.

Vodafone Idea चा 199 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea plans
Vodafone Idea plans

Vodafone Idea कडे देखील 199 रुपयांचा मासिक प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन वरील Jio प्लॅनप्रमाणे बेनिफिट्स ऑफर करतो. होय, या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये 2GB 4G डेटा आणि 300SMS चा लाभ मिळेल. त्याबरोबरच, विना अडथडा कॉलिंग करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळणार आहे.

Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन आतापर्यंत हा 179 रुपये किमतीत उपलब्ध होता. मात्र, आता हा प्लॅन 199 रुपयांच्या किमतीचा सर्वात स्वस्त मासिक प्लॅन म्हणून ओळखला जाईल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, संपूर्ण वैधतेसाठी या प्लॅनमध्ये फक्त 2GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ मिळतो. या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवसांची आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo