Jio Unlimited 5G: सध्या टेलिकॉम विश्वात खळबळ सुरु आहे कारण अलीकडेच भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली होती. त्यानंतर अखेर आज Jio आणि Airtel च्या प्लॅन्सवर नव्या किमती लागू झाल्या आहेत. थोडक्यात या दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स आजपासून महागले आहेत. दरम्यान, रिलायन्स Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती सुमारे 12% ने वाढवल्या आहेत.
आपण सर्वांना माहितीच आहे की, आतापर्यंत Jio अमर्यादित 5G डेटा आपल्या प्लॅन्समध्ये ऑफर करत होती. मात्र, आता कंपनीने केवळ निवडक प्लॅन्ससह अमर्यादित 5G डेटाचा लाभ सुरु ठेवला आहे. कंपनीने आपला ARPU म्हणजेच प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढवण्यासाठी तसेच 5G सेवांमधून महसूल वाढवण्यासाठी हे प्लॅन्समध्ये दरवाढ करण्याचे पाऊल उचलले आहे.
तुम्हाला त्या रिचार्ज प्लॅन्ससह अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळेल, जे तुम्हाला नवीन किंमतीसह दररोज 2GB डेटा देतात. मात्र, काही प्लॅन्समध्ये तुम्हाला यापेक्षाही जास्त डेटा मिळेल. आतापासून तुम्हाला केवळ पुढील प्लॅन्समध्ये अमर्यादित 5G डेटा मिळणार आहे.
रिलायन्स Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा ऑर केला जाईल. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS च्या सुविधा उपलब्ध आहेत. Jio चा हा प्लॅन मासिक म्हणजेच 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा दिला जातो. तसेच, अमर्यादित कॉलिंग आणि SMS सुविधा यात उपलब्ध आहेत. विशेषतः प्लॅनसह अमर्यादित 5G इंटरनेटचा प्रवेश देखील प्रदान केला जाईल.
Jio चा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सुविधाही उपलब्ध आहेत. तसेच, या प्लॅनसह अमर्यादित 5G इंटरनेटचा प्रवेश देखील प्रदान केला जाईल.
Jio च्या 533 रुपयांच्या प्लॅनची किंमत 629 रुपये झाली आहे. बेनिफिट्समध्ये, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि SMS फायदे देखील उपलब्ध आहेत. याशिवाय हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Jio 859 रुपयांच्या प्लॅन जवळपास तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा देखील मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सुविधाही उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, हा प्लॅन एकूण 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Jio च्या 1,199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. आजपर्यंत तुम्हाला हा प्लॅन फक्त 999 रुपयांमध्ये मिळत होता. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 3GB दैनंदिन डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS फायद्यांसह येतो. तसेच, यात तुम्हाला अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील मिळेल.
Jio आपल्या 3599 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा देत आहे. या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस फायदे देखील उपलब्ध आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अजूनही अमर्यादित 5G डेटा मिळणार आहे. होय, संपूर्ण 365 दिवसांच्या वैधतेदरम्यान तुम्हाला हे लाभ मिळतील. या प्लॅनची किंमत पूर्वी 2,999 रुपये होती.