OMG!!! ही इंटरनेट कंपनी देत आहे 100GB फ्री डेटा…

Updated on 19-Feb-2019
HIGHLIGHTS

ACT Fibernet आपल्या ब्रॉडबँड यूजर्सना एका महिन्यासाठी 100GB डेटा फ्री मध्ये उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे कंपनी कडून तुम्हाला काही निवडक ब्रॉडबँड प्लान्स सोबत अमेजॉन फायर टीवी स्टिक पण फ्री मिळत आहे.

ACT Fibernet ने अलीकडेच आपला लोगो पुन्हा एकदा बदलला आहे. पण आज एक नवीन माहिती कंपनी कडून समोर आली आहे. भारतात ACT Fibernet जवळपास 16 शहरांमध्ये काम करत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही भारतातील जवळपास 16 शहरांमध्ये या इंटरनेट प्रोवाइडर कंपनीचे प्लान्स वापरू शकता. पण आता कंपनीने एक नवीन घोषणा केली आहे. ज्यानुसार कंपनी कडून त्यांच्या ब्रॉडबँड प्लान्स सोबत 100GB डेटा फ्री दिला जात आहे.

गेल्याच आठवड्यात कंपनीने नवी दिल्लीत झालेल्या आपल्या एका इवेंट मध्ये सांगितले होते की येत्या 6-12 महिन्यांत कंपनी तुमच्यासाठी खूप काही आकर्षक गोष्टी आणणार आहे. असे बोलून जास्त वेळ देखील नाही की कंपनी कडून एक ऑफर समोर येत आहे, जी कंपनीच्या ब्रॉडबँड ग्राहकांना 100GB डेटा फ्री मध्ये देत आहे. हा डेटा कंपनीच्या अॅप द्वारे आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. टेलीकॉम टॉक ची एक बातमी पाहता त्यांनी पण या बातमीला दुजोरा दिला आहे. 

विशेष म्हणजे, अलिकडेच BSNL ने पण एक पाउल उचलले आहे जे काही की यूजर्सना त्रासदायक ठरणार आहे. BSNL ने त्यांच्या Rs 319 मध्ये येणार्‍या वॉयस ओनली प्रीपेड प्लानची वैधता कमी करून फक्त 84 दिवस केली आहे. विशेष म्हणजे या प्लान मध्ये हा बदल बीएसएनएल च्या सर्व सर्कल्स मध्ये झाला आहे. याआधी पण कंपनीने आपल्या Rs 99 मध्ये येणार्‍या वॉयस ओनली प्लान मध्ये पण बदल केला आहे. 

Rs 99 मध्ये येणार्‍या प्लान मध्ये झालेल्या बदल पाहता या प्लानची वैधता जवळपास 2 दिवसांनी कमी करण्यात आली होती आणि आता कंपनीने Rs 319 मध्ये येणार्‍या STV प्लानची वैधता कमी केली आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :