सरकार ने सांगितले आहे की यूजर्स च्या सोयीसाठी हा आदेश देण्यात आला आहे.
आधार कार्ड, मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आला आहे. मग तुम्हाला सिम कार्ड विकत घ्यायचा असेल किंवा इतर कोणतेही सरकार कागद बनवायचे आहेत. आधार विना काही करता येत नाही त्याचबरोबर पॅन इत्यादी सोबत तुमच्या टॅक्स आणि बँकेच्या सर्व कामांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आला आहे. पण आता यूजर्स ची गैरसोय होऊ नये म्हणून सरकार ने एक पाऊल घेतले आहे आणि सिम कार्ड घेण्यासाठी असलेली आवश्यकता रद्द केली आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला सिम कार्ड साठी आधार ची आवश्यकता नाही. आता तुमच्या वेरिफिकेशन साठी आधार कार्ड ची मान्यता रद्द केली आहे, पण हे फक्त सिम कार्ड साठी आहे. म्हणजे आता तुम्ही इतर ओळखपत्र ज्यात पासपोर्ट, वोटर आईडी किंवा ड्राइविंग लाइसेंस इत्यादि दाखवून सिम कार्ड घेऊ शकता. तसेच सरकार ने हे पण सांगितले आहे की हा आदेश आता पासून लागू होत आहे. या आदेशानंतर टेलीकॉम सचिव अरुणा सुन्दराजन ने सांगितले की, “हा आदेश लोकांची होणारी गैरसोय लक्षात ठेऊन घेतला आहे.” हा आदेश येण्याआधी सिम कार्ड घेण्यासाठी टेलीकॉम कंपन्या आधार वीना देत नव्हत्या. त्यामुळे कोणत्याही परदेशी व्यक्तीला सिम कार्ड लेने घेणे कठीण जात होते.