Jio-Airtel-Vi वापरकर्त्यांसाठी 56 दिवसांचा प्लॅन, 84GB डेटा आणि कॉलिंग, जाणून घ्या किंमत
Jio-Airtel-Vi वापरकर्त्यांसाठी 56 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन
तिन्ही कंपन्यांच्या 479 रुपयांचा प्लॅनची तुलना
तिन्ही प्लॅनमध्ये एकूण 84GB डेटा उपलब्ध
वर्षभराची वैधता आणि एका महिन्याच्या योजनांव्यतिरिक्त, टेलिकॉम कंपन्या मिड-टर्म प्लॅन देखील देतात. हे प्लॅन्स सुमारे दोन ते तीन महिन्यांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत. जर आपण 500 रुपयांपेक्षा कमी बजेटबद्दल बोललो, तर तिन्ही कंपन्यांकडे 479 रुपयांचा प्लॅन आहे, जो 56 दिवस चालतो. या लेखात आज तुम्हाला आम्ही रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनची तुलना करून सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात या मिड-टर्म प्लॅन्सचे सविस्तर तपशील…
हे सुद्धा वाचा: 'या' भारतीय वेब सिरीज प्रेक्षकांच्या फेव्हरेट आहेत, जर बघितले नसतील तर नक्की बघा
Jio चा 479 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना यामध्ये एकूण 84 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये जिओच्या सर्व ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
Airtelचा 479 रुपयांचा प्लॅन
Airtelच्या या प्लॅनमधील बहुतांश फिचर्स जिओच्या वरील प्लॅन प्रमाणेच आहेत. Airtelचा हा प्लॅन एकूण 56 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लँनमध्ये एकूण 84 GB डेटा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जातात. याशिवाय, यामध्ये फ्री HelloTunes, Wink Music, Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि Apollo 24/7 Circle यांवर मेंबरशिप मिळेल.
हे सुद्धा वाचा : Realme GT Neo 3T स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार, बघा आकर्षक डिझाईन आणि फीचर्स
Vi चा 479 रुपयांचा प्लान
Viच्या या प्लॅनमध्ये देखील इतर प्लॅन्सप्रमाणे 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS दररोज उपलब्ध आहेत. याशिवाय, यामध्ये रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत मोफत डेटादेखील मिळणार आहे. तसेच, यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies and TV वर फ्री ऍक्सेस, अशा सुविधा उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile