Reliance Jio
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. दरम्यान, सध्या Jio ने अनेक प्लॅन्ससह ग्राहकांना मोफत JioAICloud स्टोरेज देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने 2024 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 100GB पर्यंत मोफत JioAICloud स्टोरेज देण्याची घोषणा केली होती.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, रिलायन्स Jio ने 2024 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे फिचर ‘AI Everywhere for Everyone’ उपक्रमांतर्गत सादर केले आहे, ज्याचा उद्देश क्लाउड स्टोरेज आणि AI सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये, वापरकर्ते फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि डिजिटल कंटेंट आणि डेटा संग्रहित करू शकतात. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडक ग्राहकांसाठी 100GB AI क्लाउड स्टोरेज आणले होते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, दिवाळीनंतर निवडक लोकांना काही प्लॅन्सअंतर्गत 100GB AI क्लाउड स्टोरेज मोफत दिले होते. मात्र, आता कंपनीने ही सेवा त्यांच्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी सुरू केली आहे. जिओ वापरकर्त्यांना 50GB क्लाउड स्टोरेज निवडक प्लॅन्समध्ये मिळणार आहे. जाणून घेऊयात प्लॅन्स-
Jio प्रीपेड ग्राहकांबद्दल बोलायचे झाल्यास, Jio कंपनी 299 रुपयांचा प्लॅन आणि त्यावरील सर्व प्लॅनसह 50GB JioAiCloud स्टोरेज मोफत देत आहे. त्याबरोबरच, या सर्व प्लॅन्समध्ये 50GB क्लाउड स्टोरेज बंडल ऑफर म्हणून येईल.
या बेनिफिट्ससह येणाऱ्या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्यांच्या निवडक प्लॅन्समध्ये मोफत 50GB AI क्लाउड स्टोरेज सुविधा दिली आहे. या ऑफरअंतर्गत 349 रुपये, 449 रुपये, 649 रुपये, 749 रुपये आणि 1549 रुपयांच्या प्लॅन इ. चा समावेश आहे.