मोठी बातमी! AIRTEL च्या तब्बल 37 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा लीक? डार्क वेबवर विक्री, जाणून घ्या प्रकरण

Updated on 05-Jul-2024
HIGHLIGHTS

37 कोटींहून अधिक Airtel वापरकर्त्यांचा डेटा लीक झाल्याची बातमी

X (Twitter) वर एका हॅकरने एक खळबळजनक ट्विट केले आहे.

Airtel ग्राहकांच्या डेटा लीकवर कंपनीने काय प्रतिक्रिया दिली?

नुकतेच एका बातमीने टेलिकॉम विश्वासह सर्वत्र इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रत्यक्षात एका हॅकरने म्हटले आहे की, त्याने 37 कोटींहून अधिक Airtel वापरकर्त्यांचा डेटा चोरला आहे. मात्र, लक्षात घ्या की, कंपनीने एक स्टेटमेंट जारी करून कोणताही डेटा लीक नाकारला आहे. असे असले तरीही संपूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात-

37 कोटींहून अधिक Airtel वापरकर्त्यांचा डेटा लीक?

खरं तर, X म्हणेजच आधीच्या Twitter वर एका हॅकरने एक खळबळजनक ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Airtel च्या 37 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा हॅकरजवळ असल्याची माहिती देण्यात आली आहे. खालील प्रमाणे तुम्ही हॅकरची पोस्ट तुम्ही बघू शकता.

याव्यतिरिक्त, ग्राहकांच्या डेटाची डार्क वेबवरही बोलीही लावली जात आहे, असे देखील सांगितले आले आहे. मात्र, इतकंच नाही तर परदेशातील डिप्लोमॅटिक पासपोर्टधारकांचा डेटाही यशस्वीपणे विकल्याचा दावा या हॅकरकडून करण्यात आला आहे.

Airtel ग्राहकांचा कोणता डेटा लीक झाला?

आम्ही तुम्हाला सांगतो की, या हॅकरची ओळख xenZen म्हणून करण्यात आली आहे. त्यानुसार, हॅकरने सुमारे 375 दशलक्ष Airtel ग्राहकांच्या डेटाचा भंग केला आहे. या डेटामध्ये ग्राहकांचे फोन नंबर, ईमेल ऍड्रेस, आधार कार्ड क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती देखील समाविष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा सर्व डेटा जून 2024 पर्यंत अपडेट करण्यात आला होता.

Airtel ने दिली प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर Airtel च्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की, “Airtel च्या ग्राहकांच्या डेटाशी तडजोड किंवा उल्लंघन केल्याचा आरोप करणारा एक अहवाल आला आहे. Airtel च्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याचा हा निहित हितसंबंधांचा एक असाध्य प्रयत्न आहे, या अहवालात यापेक्षा अधिक काही नाही.” मात्र, यावर आम्ही सखोल तपास केला आहे आणि Airtel सिस्टमचे कोणतेही उल्लंघन झाले नाही याची पुष्टी करू शकतो.”, असे निवेदनात AIRTEL ने सांगितले आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :