खरंच ! VI च्या मोबाइल रिचार्जवर मिळतोय तब्बल 2,400 रुपयांचा कॅशबॅक, वाचा सविस्तर

खरंच ! VI च्या मोबाइल रिचार्जवर मिळतोय तब्बल 2,400 रुपयांचा कॅशबॅक, वाचा सविस्तर
HIGHLIGHTS

VI कडून वापरकर्त्यांसाठी अप्रतिम ऑफर

VI रिचार्जवर वापरकर्त्यांना 2400 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल

कॅशबॅक केवळ 30 दिवसांसाठी वैध असेल

टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea (Vi) ने युजर्ससाठी अप्रतिम ऑफर आणली आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी रिचार्जवर वापरकर्त्यांना एकूण 2,400 रुपयांच्या कॅशबॅक देईल. ही ऑफर अशा यूजर्ससाठी आहे, जे सध्या 2G फोन वापरत आहेत. कॅशबॅकसाठी, या 2G वापरकर्त्यांना 4G हँडसेट वापरणे सुरू करावे लागेल. वापरकर्त्यांना 4G वर शिफ्ट करण्यासाठी, कंपनी 299 रुपये आणि त्याहून अधिकच्या अनलिमिटेड पॅकसह रिचार्ज करणाऱ्या वापरकर्त्यांना प्रति रिचार्ज 100 रुपये कॅशबॅक ऑफर देऊन आकर्षित करत आहे. लक्षात ठेवा की, 2400 रुपयांच्या पूर्ण कॅशबॅकसाठी, तुम्हाला नमूद केलेल्या प्लॅनसह 24 वेळा रिचार्ज करावे लागेल.

कंपनी मेसेजद्वारे माहिती देत ​​आहे

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 2G हँडसेट वापरणारे Vodafone-Idea वापरकर्ते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे 2G हँडसेट असल्यास, तो नवीन 4G हँडसेटमध्ये बदला. कंपनी पात्र युजर्सना मेसेज करून या ऑफरची माहितीही देत ​​आहे. 4G हँडसेट घेतल्यानंतर, तुम्हाला 2400 रुपयांच्या कॅशबॅकसाठी 24 वेळा रिचार्ज करावे लागेल. 

हे सुद्धा वाचा : लूक्स आणि फीचर्समध्ये सर्वांना फेल करेल Crossbeatsचे नवीन स्मार्टवॉच, किंमतदेखील कमी

Vi ऍपमध्ये कॅशबॅक तपासता येईल 

इनकमिंग कॅशबॅक तपासण्यासाठी तुमच्या 4G स्मार्टफोनवर Vi ऍप इंस्टॉल करा. या ऍपच्या My Coupons विभागात जाऊन तुम्हाला तुमचा कॅशबॅक तपासता येईल. तुमच्या Vi ऍपमध्ये नियमित रिचार्ज केल्यावर 100-100 रुपये कॅशबॅक स्वरूपात 24 वेळा जमा केले जातील.

कॅशबॅक केवळ 30 दिवसांसाठी वैध असेल

ही ऑफर फक्त प्रीपेड वापरकर्त्यांसाठी आहे. ऑफरचा लाभ घेणे सुरू ठेवण्यासाठी, 299 रुपये किंवा त्यावरील अनलिमिटेड पॅकसह रिचार्ज करणे आवश्यक आहे. Vi ऍपमध्ये जमा केलेला कॅशबॅक 30 दिवसांसाठी वैध असेल. हा कॅशबॅक मोबाईल रिचार्जसाठी वापरता येणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo