Airtel ने सोमवारी 699 रुपयांपासून सुरु होणारे तीन नवीन XStream फायबर ब्रॉडबँड योजना सादर केल्या आहेत. हे प्लॅन्स इंटरनेट तसेच 350हून अधिक टीव्ही चॅनेलचा ऍक्सेस देतात. 'ऑल-इन-वन' नावाचा एअरटेलचा नवीन ब्रॉडबँड प्लॅन Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Netflix यासह 17 प्रीमियम ओव्हर-द-टॉप OTT प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस देतो. कंपनीने नवीन ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 'झिरो' इन्स्टोलेशन कॉस्ट आणि पहिल्या महिन्याचे भाडे घेणार नाही, असा दावा केला आहे. ग्राहकांना त्यांच्या टीव्हीवर टीव्ही कंटेन्ट आणि OTT ऍक्सेस मिळवण्यासाठी Airtel 4K Xstream TV Box खरेदी करणे आवश्यक आहे.
नवीन ऑल-इन-वन एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँड प्लॅन्स 699 रुपये, 1,099 रुपये आणि 1,599 रुपये दरमहा भाड्याने येतात. ज्यामध्ये दरमहा 3333GB च्या FUP मर्यादेसह अमर्यादित डेटा मिळेल. चला तर जाणून घेऊयात या तिन्ही प्लॅनबाबत सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Vivo आणि Jioची भागीदारी: Vivo X80 वर भारतात 5G नेटवर्कची चाचणी
अमर्यादित डेटासह, Xstream फायबर ब्रॉडबँड प्लॅन Airtel Xstream Premiumचा देखील ऍक्सेस देतात. जे SonyLIV, ErosNow, Lionsgate Play, आणि Hungama Play सह 14 OTT ऍप्सवर सिंगल लॉगिन देईल. हा प्लॅन 350 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा ऍक्सेस देतो, जो ग्राहक Airtel 4K Xstream Box खरेदी केल्यानंतर प्राप्त करू शकतात. हा बॉक्स दोन हजार रुपयांना विकत मिळेल.
699 रुपयांचा एअरटेल ब्रॉडबँड प्लॅन 40Mbps स्पीड ऑफर करतो. त्याचप्रमाणे, 1,099 रुपयांचा प्लॅन 200Mbps स्पीड ऑफर करतो. तर, 1,599 रुपयांचा प्लान 300Mbps स्पीड ऑफर करतो. याशिवाय, 699 रुपयांचा प्लॅन Airtel Xstream Premium व्यतिरिक्त Disney+ Hotstar ऍक्सेससह येतो. तसेच, 1,099 रुपयांचा प्लॅन Amazon Prime आणि Disney+ Hotstarच्या ऍक्सेससह येतो. त्याबरोबरच, शेवटच्या 1,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये वरील दोन अन्य OTT सेवांव्यतिरिक्त Netflixचा ऍक्सेसदेखील मिळेल.