Strawberry Moon: येत्या 21 जूनच्या पौर्णिमेला दिसणार ‘स्ट्रॉबेरी मून’! जाणून घ्या अर्थ, वेळ आणि इतर सर्व तपशील
21 जून रोजी येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला 'स्ट्रॉबेरी मून' असे म्हटले जाते.
21 जून रोजी सकाळी 6 वाजता स्ट्रॉबेरी मून भारतात सुरू होईल.
या पौर्णिमेला केवळ स्ट्रॉबेरी मूनच नाही तर 'हनी मून' आणि 'रोझ मून' असे देखील म्हणतात
Strawberry Moon 2024: आपण सर्वांना माहितीच आहे की, प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, परदेशात पौर्णिमा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, 21 जून रोजी येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे म्हटले जाते. Nasa च्या मतानुसार, अशा पौर्णिमा ही खगोलशास्त्रात रुची असलेल्या लोकांसाठी सुवर्णसंधी असल्याचे सांगितले गेले आहे. लोक चांगल्या टेलिस्कोपचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डे आणि पर्वत पाहण्यास सक्षम असतील, असे देखील म्हटले गेले आहे.
Also Read: आता थेट सॅटेलाईटवरून मिळणार स्मार्टफोन्स सर्व्हिस! SpaceX ने अवकाशात सोडले 20 स्टारलिंक उपग्रह
स्ट्रॉबेरी मून
जून महिन्याच्या पौर्णिमेला अमेरिकन आदिवासींनी ‘स्ट्रॉबेरी मून’ असे नाव दिले आहे. अहवालानुसार, ‘स्ट्रॉबेरी मून’ हे नाव अल्गोनक्विन, ओजिब्वे, डकोटा आणि लकोटा लोक वापरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, अहवालानुसार, 21 जून रोजी सकाळी 6 वाजता स्ट्रॉबेरी मून भारतात सुरू होईल, परंतु उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होत असल्याने चंद्र तेव्हा दिसणार नाही. ही पौर्णिमा 22 जूनच्या सकाळपर्यंत राहील, त्यामुळे तुम्हाला 21 जूनच्या रात्री स्ट्रॉबेरी मून पाहता येईल. स्ट्रॉबेरी मून दरम्यान चंद्र असाधारणपणे मोठा दिसेल.
अमेरिकन अंतराळ संस्था Nasa च्या म्हणण्यानुसार, “स्ट्रॉबेरी मून जवळपास तीन दिवस पूर्णपणे दिसणार आहे. या पौर्णिमेला केवळ स्ट्रॉबेरी मूनच नाही तर ‘हनी मून’ आणि ‘रोझ मून’ असे देखील म्हणतात. नासाच्या म्हणण्यानुसार, स्ट्रॉबेरी मून हा या वर्षीचा सर्वात खालची पौर्णिमा असेल, जी क्षितिजापेक्षा फक्त 21.9 अंश वर असणार आहे. म्हणजेच ते आकाशात खालच्या दिशेने दिसणार आहे.”
साधारण लोकांचा असा गैरसमज असतो की, चंद्र मोठा दिसणे म्हणजे सुपरमून होय. पण, स्ट्रॉबेरी मून म्हणजे सुपरमून नव्हे. सुपरमून पाहण्यासाठी तुम्हाला ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर सलग चार सुपरमून पाहायला मिळेल, अशी देखील माहिती मिळाली आहे. तसेच, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, स्ट्रॉबेरी मूननंतरची पुढची पौर्णिमा 21 जुलै रोजी दिसेल, ज्याला ‘बक मून’ असे म्हणतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile